शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन यंत्रणेच्या पाण्याचा उपयोग भांडे धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:56 IST

रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालयातील प्रकार : व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.जिल्ह्यातील एकमेव शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. या यंत्रणेचे नुकतेच नुतनीकरण सुध्दा करण्यात आले. एखाद्या वेळेस रुग्णालयात आग लागल्याची घटना घडल्यास अशा स्थिती वेळीच उपाय योजना करण्यासाठी मदत व्हावी, रुग्णांच्या जीवाला धोका पोहचू नये, यादृष्टीने अग्निश्मन यंत्रणा लावण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णालयाच्या इमारतीला लावलेल्या अग्निश्मन यंत्रणेच्या लावलेल्या पाईपमधील पाण्याचा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या सुरक्षेवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. अग्निश्मन यंत्रणेच्या पाईपमधील पाण्याचा सर्रास वापर केला जात असताना या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या काही जागृत नागरिकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात सुध्दा आणली.रुग्णालयाच्या इमारतीला सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र पाईप लाईनचे लॉक तुटले असल्याने त्यातून रुग्णांचे नातेवाईक पाणी नेत आहे. लवकरच याची दुरूस्ती करुन नवीन लॉक लावण्यात येईल.- डॉ. प्रदीप कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, बीजीडब्ल्यू रुग्णालय गोंदिया