लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.सन २०१८ मध्ये रावणवाडी ते अर्जुनी दरम्यान कालव्याचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले. सध्या तो कालवा बुझून गेला आहे. त्यात पावसाचे पाणी भरून गेल्याने कालवा फुटला व ते पाणी गावाच्या सीमेत तसेच शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे शेतात लावण्यात आलेले पीक वाहून गेले व मोठे नुकसान झाले. तसेच गावाच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना समस्या निर्माण झाली.सदर प्रकाराकडे लक्ष देवून कालवा व शेतातील पीक पाहणी करावी.तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जुनीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शहारे, ओमकार रहांगडाले, पंचम बिसेन, तिलकचंद रहांगडाले आदी शेतकºयांनी केली आहे.
कालवा फुटून शेतात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:47 IST
रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.
कालवा फुटून शेतात शिरले पाणी
ठळक मुद्देपिकांचे नुकसान : सिंचन विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार