शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सेफ्टीवॉल अभावी दररोज हजार लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नगर परिषद अग्नीशमन विभागाचे फायर स्टेशन गणेशनगर परिसरात असून या फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांमध्ये ...

ठळक मुद्देनगर परिषदचे फायर स्टेशन : वर्षभरापासून समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद अग्नीशमन विभागाचे फायर स्टेशन गणेशनगर परिसरात असून या फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांमध्ये पाणी भरले जाते. मात्र फायर स्टेशनमध्ये मागील वर्षभरापासून सेफ्टीवॉल लावण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज एक हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दरवर्षी शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. मागीलवर्षी तर पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे आणून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता.एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या असताना दुसरीकडे मात्र हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच शहरातील नगर परिषद अग्नीशमन विभाग कधी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, सुरक्षा विषयक साधनांचा अभाव तर कधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावरुन चर्चेत असतो. सध्या हा विभाग आता दररोज होणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असल्यावरुन चर्चेत आहेत. नगर परिषद फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांत पाणी भरले जाते. याठिकाणी पाणी भरण्यासाठी मोठ्या पाईपचा वापर केला जातो.अग्नीशमन वाहनांमध्ये पाणी भरताना पाण्याचा अपव्यय होवू नये यासाठी त्या ठिकाणी सेफ्टीवॉल लावणे आवश्यक आहे. मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत असताना देखील सेफ्टीवॉल लावण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज एक हजार लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महिन्याकाठी ३० हजार लीटर पाण्याची अपव्यय होत आहे.हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरूच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असताना व दुसरीकडे शहरवासी पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत असताना अद्यापही नगर परिषद व अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी