शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व्हायचे,मग सातवा वर्ग उत्तीर्ण आहात का ? करा खात्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाची अट : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आता सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाणार आहे. सरपंचपदी विराजमान होण्यासाठी सदस्य सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्या शिवाय त्याला सरपंच होता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होणाऱ्या उमेदवाराला किमान सातवा वर्ग पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आधी सातवा वर्ग उत्तीर्ण आहे किंवा नाही याची खात्री करावी लागणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत थोडा उत्साह कमी दिसून येत आहे. तर गुरुवारी (दि.२४) राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहणारा उमेदवार किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असण्याची अट जाहीर केली आहे. सातवा वर्ग उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. म्हणजे सरपंच व्हायचे असले तर सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना सुध्दा उमेदवारी देताना याची खात्री करावी लागणार आहे. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व फार वाढले आहे. तर विविध योजना सुध्दा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच हा सुशिक्षित असल्यास गावाचा कायपालट होवू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी लागू केलेली सातवा वर्ग उत्तीर्ण असल्याची अट फार कमी किमान १२ वर्ग उत्तीर्ण असल्याची अट ठेवणे आवश्यक होते असा सृूर नागरिकांमध्ये आहे. 

केवळ दोन उमेदवारांनी दाखल केले अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मागील दोन दिवसात तिरोडा तालुक्यात १ आणि सालेकसा तालुक्यातील १ उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १६३४ जागांसाठी ३ लाख ३८ हजार मतदार करणार मतदान १८९ ग्रामपंचायतींच्या १६३४ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यंदा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणुकीबाबत उमेदवारांमध्ये अनुउत्साह दिसून येत आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक