शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

सुट्या पैशांसाठी भटकंती

By admin | Updated: November 13, 2016 01:19 IST

नकली नोटा आणि काळा पैश्यांवर अंकुश लावण्यासाठी ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर...

नागरिक त्रस्त : जुन्या नोटा जमा करण्यासाठी बँका झाल्या हाऊसफुल्लगोंदिया : नकली नोटा आणि काळा पैश्यांवर अंकुश लावण्यासाठी ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. मंगळवारच्या रात्रीपासून काळा पैसा असणाऱ्या धनाढ्यांची झोप उडाली असे वाटत असले तरी त्यांनी बऱ्याच प्रमाणात त्या पैशाची विल्हेवाट लावण्याचे मार्ग शोधले आहेत. परंतू मेहनतीने कमावलेला आपला पैसा वाया जाऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांची धडपड सुरू आहे. यासोबतच गरजवंत लोक बँकेतून पैसे काढण्यासाठी तासन तास बँकांसमोर रांगा लावून बसले आहेत.आयुष्यभर राबराब राबून म्हातारपणासाठी पैसे राखून ठेवणाऱ्या ग्रामीण महिला सरकारच्या या निर्णयाने जबरदस्त हादरल्या आहेत. प्रत्येक कामासाठी ५०० व १०० ची नोट काढत आहेत, परंतु त्या नोटा कुणीच घेत नाही. बँकेत दोन-तीन तास वाट पाहिल्यानंतर हाती केवळ दोन हजार रुपयांची नोट पडत आहे. परंतू दैनंदिन गरजा भागविण्यासाठी चिल्लर रकमेची आवश्यकता असल्याने आप्तस्वकीयांकडून चिल्लर मागण्याचा सपाटा सुरू आहे. बँकेत सकाळी सात वाजतापासूनच गर्दी जमा होते. आमगावच्या स्टेट बँकेत सकाळी ७ वाजतापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मागील दोन दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या बँक रात्री ८ वाजतापर्यंत सुरू होत्या. तरीही नोटा बदलवून घेण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे. विद्युत बिल केंद्रात कालपर्यंत सदर नोटा स्वीकारण्यात आल्या. मात्र सुट्या पैश्यांचा तुटवडा आल्याने पुर्ण नोट जमा करा असा पवित्रा घेण्यात आला. खिशात ५०० व १००० ची नोट असूनही अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एकमेकांकडून नोेटांच्या अदलाबदली करतानाही काही लोक आढळले. (जिल्हा प्रतिनिधी)पैशामुळे पती-पत्नीत वादपती वर्षभरापासून पैसे मागत असला तरी त्याला आपल्याकडे कवडी नाही, असे सांगणाऱ्या महिलांकडे आता लाखोच्या घरात पैसे निघत असल्याने पती आपल्या पत्नीवर संतप्त होऊन काही ठिकाणी त्यांना मारहाण होण्याचाही प्रसंग ओढवला आहे. अशीच एक घटना आमगाव तालुक्याच्या कट्टीपार येथे घडली. पतीने कर्ज करून काही महिन्याअगोदर आॅटो खरेदी केला. परंतु पत्नीकडून मदत मिळाली नाही. आता नोटा बंद झाल्याने त्या आॅटो घेणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने चक्क आपल्या जवळील १ लाख ५० हजार रूपये बाहेर काढल्याने त्या पतीने पत्नीला चांगलाच चोप दिल्याची चर्चा आहे.