शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजारावर शेतकरी कृषीपंपासाठी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:56 IST

राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता.

ठळक मुद्देदीड वर्षापासून पायपीट कायम : विद्युत वितरण कंपनीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. मात्र हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून जिल्ह्यातील २८२० शेतकरी मागील मागील दीड वर्षांपासून कृषीपंपाच्या जोडणीसाठी विद्युत वितरण कंपनीच्या पायऱ्या झिजवित असल्याचे चित्र आहे.सिंचनाअभावी शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत आहे. शेतकºयांना विहीर देण्यासाठी शासन तत्पर आहे. परंतु या विहिरीतील पाणी शेतपिकांना देण्यासाठी विद्युत कनेक्शन देण्यास विद्युत वितरण कंपनी अपयशी ठरली आहे. धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक असल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती धानपिकावरच अवलंबून आहे.धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मागील दोन-तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे. दरवर्षी कर्ज घेऊन चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे त्यांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी शेतपीक वाया जात आहे. तर उन्हाळी पिकांची लगावड करण्याचे स्वप्न यंदा केवळ स्वप्नच राहिले.जिल्ह्यातील तीन हजाराच्या घरात शेतकऱ्यांनी कृषीपंपाकरीता विद्युत वितरण विभागाकडे अर्ज करुन कृषीपंपासाठी वीज कनेक्शन मागीतले. परंतु मागील दीड वर्षापासून डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक वाया गेले.गोंदिया तालुक्यातील ४९३, गोरेगाव तालुक्यातील ४३४, तिरोडा ४५६, आमगाव १४८, सालेकसा २३७, देवरी २३३, सडक-अर्जुनी ३१२, अर्जुनी-मोरगाव ५०७ अशा एकूण शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनकरीता डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन दिले नाही. त्यामुळे वीज जोडणी केव्हा करुन मिळणार यासाठी शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या पायºया झिजवित आहेत.टेंडरच्या नावावर टाळाटाळशेतकºयांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी मागील दीड वर्षापासून टाळाटाळ केली जात आहे. कृषीपंपाचे कनेक्शन देण्यासाठी कंत्राट देण्याची टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सर्व शेतकºयांना सांगून मागील वर्षभरापासून एकच पाढा विद्युत वितरण कंपनी वाचत आहे. टेंडर प्रक्रिया सुरु असल्याच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली जात असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज