शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दहाव्या ‘ग्रीन लिस्ट’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या अंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही १८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तर दहावी ग्रीन यादी अजूनही बँकाना प्राप्त झाली नसल्याने खरीप हंगामात शेतकरी ...

ठळक मुद्देकर्जमाफीतील शेतकऱ्यांची यादी : १८ हजार शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या अंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले. मात्र कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी अद्यापही १८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तर दहावी ग्रीन यादी अजूनही बँकाना प्राप्त झाली नसल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे.मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आले होते. याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला. पावसाअभावी हाती आलेले पीक गमवावे लागल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे बँकेतून उचल केलेल्या कर्जाची परतफेड करणे शेतकºयांना शक्य झाले नाही. संकटातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यात जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मात्र आॅनलाईन प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले. तसेच अर्जातील माहिती आणि बँकाची माहिती न जुळल्याने पेच निर्माण झाला. परिणामी कर्जमाफीची प्रक्रिया लांबली. कर्जमाफीचा घोळ संपत नसल्याने शासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. शासनाने आतापर्यंत ९ ग्रीन याद्या बँकाना पाठविल्या असून त्यातील ६४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र अद्यापही दहावी ग्रीन यादी आली नसल्याने यातील १८ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. सध्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे. मात्र खरीपात पेरणी व इतर कामे करण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेच्या पायºया झिजवित आहे. मात्र बँकेचे अधिकारी यादी आली नसल्याचे सांगून शेतकºयांना आल्या पावलीच परत पाठवित आहे. जिल्ह्यातील ६४ हजार शेतकºयांच्या बँक खात्यावर आत्तापर्यत १८८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. तर उर्वरित १८ हजार शेतकºयांना अद्यापही पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी