शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी प्रकल्पग्रस्त आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:11 IST

तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना धोका पत्कारुन जीर्ण घरांमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देजीर्ण घरांमध्ये वास्तव्य : प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष

विजेंद्र मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्क्नखातीया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना धोका पत्कारुन जीर्ण घरांमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मागील आठ वर्षांपासून बिरसी येथे राहणारे नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.मात्र प्रशासनाकडून त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दिले जात असल्याचे चित्र आहे. पुनर्वसन होणार असल्याने त्यांना जीर्ण घरांची दुरूस्ती सुध्दा करता येत असून त्याच घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ उभारण्यासाठी भारतीय विमान प्राधिकरणाने या परिसरातील जमिनी संपादित केल्या. येथील गावकऱ्यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुध्दा सुरू आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच पुनर्वसनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.मात्र आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नसल्याने प्रकल्पग्रस्तांतमध्ये रोष व्याप्त आहे.घरे जीर्ण झाली असल्यामुळे अनेकदा त्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र प्रशासनाकडून प्रक्रिया सुरु असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम सुरू आहे.खात्यात अद्यापही निधी नाहीयेथील प्रकल्पग्रस्तांना घराचे बांधकाम करण्यासाठी शासनाच्या वतीने पुनर्वसन पॅकेज म्हणून ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. याची यादी ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आली आहे. मात्र अद्यापही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर दिवसेंदिवस रेती, विटा, सिमेंटचे लोखंडाचे भाव वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना महागाईचा सुध्दा फटका सहन करावा लागत आहे.बिरसी विमानतळाच्या जमिनीवर काही अनाधिकृत अतिक्रमण आहे. जेव्हापर्यंत ते अतिक्रमण हटविण्यात येत नाही तेव्हापर्यंत पुनर्वसन करणे कठीण आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्राधिकरणातर्फे नोटीस बजाविण्यात आली.-सचिन बी.खंगार, बिरसी विमानतळ संचालक.