शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:19 IST

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली.

ठळक मुद्दे९२ शेतकऱ्यांचे पैसे मागविले परत : कर्जमाफीचा घोळ कायम

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली. मात्र त्यापैकी केवळ ११ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम झाली असून ८ हजार शेतकऱ्यांना बँकानी अद्यापही प्रतीक्षेत ठेवले आहे.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यातंर्गत जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी प्राथमिक स्वरुपात कर्जमाफीस पात्र ठरले होते. मात्र त्यानंतर शासनाने कर्जमाफीचा लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळू नये, यासाठी चावडी वाचन आणि कर्जमाफीच्या याद्यांची पडताळणी करण्यासाठी ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा निकष लावला. मात्र यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक जुळत नसल्याने यातील घोळ वाढला. परिणामी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याद्यांमधील घोळ टाळण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाची मदत घेण्यात आली. मात्र या विभागाने कर्जमाफीच्या प्रक्रियेतील गुंता अधिक वाढविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ७३ हजार शेतकऱ्यांपैकी शासनाने २६८० ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी व त्यासाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३३७ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. त्यानंतर पुन्हा १६ हजार ५३६ ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची दुसरी यादी व ५९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. एकूण १९ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी शनिवार (दि.२) पर्यंत ११ हजार ७१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. तर ग्रीन यादीतील ८ हजार शेतकºयांना अद्यापही रक्कम जमा होण्याची प्रतीक्षाच आहे.त्या शेतकऱ्याची रक्कम परत मागविलीमुंबई आयटी विभाग आणि शासनाने जिल्ह्यातील ग्रीेन यादीतील शेतकऱ्याची यादी जिल्हा बँकेला पाठविली. त्यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच शासनाने ग्रीन यादीतील त्या ९२ शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा न करण्याचे निर्देश जिल्हा बँकेला दिले. तसेच ३४ लाख १३ हजार ४२८ रुपयांची रक्कम सुध्दा शासनाने परत मागविल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.आता बँक स्तरावर खाते तपासणी मोहीमशेतकरी कर्जमाफीवरुन राज्य सरकार दररोज एक नवीन निकष लावत आहे. आयटी विभागाची मदत घेऊन देखील कर्जमाफीच्या याद्यांमधील घोळ संपलेल्या नाही. त्यामुळे आता शनिवार (दि.२) पासून ग्रीन यादीतील शेतकºयांचे बँक खाते आणि आधार क्रमांक तपासणीची मोहीम सुरू केली आहे.तिसरी यादी येणार मंगळवारीकर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची तिसरी यादी मंगळवारी (दि.५) रोजी येण्याची शक्यता आहे. मात्र बँकाना आधी प्राप्त झालेल्या याद्यांमधील ८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. तर तिसऱ्या यादीतील रक्कम केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या सर्व प्रक्रियेमुळे बँकेचे कर्मचारी तणावात असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांची पायपीट कायमकर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही कर्जमाफीची रक्कम बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. जोपर्यंत खाते शून्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्जाची उचल करता येत नाही. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बँकेच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी