शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 11:26 IST

कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करावे लागणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या यादीत केवळ २६४८ नावे पुन्हा दोन महिने लागणार

आॅनलाईन लोकमतगोंदिया : नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करावे लागणार आहे.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र दिवाळी संपून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकरी प्राथमिक यादीत पात्र ठरले होते. यानंतर चावडी वाचन करून अर्जांची ग्रीन, येलो व रेड यादीत विभागणी करण्यात आली. त्यानंतर या यादीची अंतिम चाचपणी करण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यापैकी आयटी विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रीन यादीतील २८४८ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना पाठविली. यात जिल्हा बँकेचे २६२० व राष्ट्रीयीकृत बँकेच्या २८ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून जिल्हा बँकेला १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रुपये व राष्ट्रीयीकृत बँकाना १० लाख ३३ हजार २९९ रुपयांचा निधीदेखील प्राप्त झाला आहे.मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम ग्रीन यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास पुन्हा पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दोन महिने चालणार प्रक्रियाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी बऱ्याच अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्या. तर एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्यांनी अर्ज भरले. तर काहींनी एकच आधार क्रमांक जोडला त्यामुळे घोळ निर्माण झाला आहे. या अर्जांची पडताळणी करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कर्जदार शेतकऱ्यांची यादी पाठविली होती. त्यात जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र चावडी वाचनानंतर यातील बऱ्याच शेतकऱ्यांची नावे कमी झाली. त्यानंतर पुन्हा अर्जांची चाचपणी करण्यासाठी हे सर्व अर्ज मुंबई आयटी विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिमत: जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, याची आकडेवारी बँका आणि निबंधक कार्यालयाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही.

पीक कर्जापासून वंचितकर्जमाफीच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा पीक कर्जाची उचल केली नाही. त्यातच यंदा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचा विमा न उतरविल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी