शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:59 IST

नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपहिल्या यादीत केवळ २६४८ नावे : पुन्हा दोन महिने लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जमाफीसाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ करावे लागणार आहे.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र दिवाळी संपून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकºयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकरी प्राथमिक यादीत पात्र ठरले होते. यानंतर चावडी वाचन करून अर्जांची ग्रीन, येलो व रेड यादीत विभागणी करण्यात आली. त्यानंतर या यादीची अंतिम चाचपणी करण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यापैकी आयटी विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रीन यादीतील २८४८ शेतकºयांची पहिली यादी जिल्हा आणि राष्टÑीयकृत बँकाना पाठविली. यात जिल्हा बँकेचे २६२० व राष्टÑीयकृत बँकेच्या २८ कर्जदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून जिल्हा बँकेला १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रुपये व राष्टÑीयकृत बँकाना १० लाख ३३ हजार २९९ रुपयांचा निधीदेखील प्राप्त झाला आहे.मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम ग्रीन यादीतील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होण्यास पुन्हा पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.दोन महिने चालणार प्रक्रियाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी बºयाच अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्या. तर एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्यांनी अर्ज भरले. तर काहींनी एकच आधार क्रमांक जोडला त्यामुळे घोळ निर्माण झाला आहे. या अर्जांची पडताळणी करुन शेतकºयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता या विभागाच्या अधिकाºयांनी वर्तविली आहे.पात्र शेतकºयांचा आकडा गुलदस्त्यातजिल्हा आणि राष्टÑीयकृत बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कर्जदार शेतकºयांची यादी पाठविली होती. त्यात जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकºयांचा समावेश होता. मात्र चावडी वाचनानंतर यातील बºयाच शेतकºयांची नावे कमी झाली. त्यानंतर पुन्हा अर्जांची चाचपणी करण्यासाठी हे सर्व अर्ज मुंबई आयटी विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिमत: जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, याची आकडेवारी बँका आणि निबंधक कार्यालयाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही.पीक कर्जापासून वंचितकर्जमाफीच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील बºयाच शेतकºयांनी यंदा पीक कर्जाची उचल केली नाही. त्यातच यंदा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचा विमा न उतरविल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी