लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : मागील ३ दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, तलाव व धरण ओव्हरफ्लो झाले आहे. वैनगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीने रौद्ररुप धारण केले आहे. पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी गावात शिरल्याने चांदोरी खुर्द, पिपरिया, ढिवरटोली, बोंडराणी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा, करटी खु., गावाला धोका निर्माण होऊ शकते.या पावसामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली आले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर किंडगीपार व ढिवरटोली येथील कुटुंब पाण्यात अडकले आहे. बारबरीक कंपनीची खदान पाण्याखाली आल्याने व खदानीत पाणी शिरल्याने गावाला धोका निर्माण झाला आहे. चांदोरी खुर्द ते बाघोली, चांदोरी खुर्द ते कन्हारटोली गावांचाही संपर्क तुटला आहे. करटी खु. व टोलीचा संपर्क तुटला, पिपरिया व ढिवरटोली, गोंडमोहाडी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा गावाचा संपर्क तुटला आहे. तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्याशी संपर्क केला असता किडंगीपार येथे नायब तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी व्यवस्थेसाठी गेले असल्याचे सांगीतले. गोंदियावरुन बोट बोलविण्यात आली आहे. ती आल्यानंतर या ठिकाणी मदत कार्य सुरू करण्यात आले.मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर व पुजारीटोला, कालीसरार तसेच सिरपूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सन २००६ नंतरची प्रथमच ही स्थिती निर्माण झाली असून त्यापेक्षा ही जास्त पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैनगंगेने केले रौद्ररुप धारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST
चांदोरी खुर्द ते बाघोली, चांदोरी खुर्द ते कन्हारटोली गावांचाही संपर्क तुटला आहे. करटी खु. व टोलीचा संपर्क तुटला, पिपरिया व ढिवरटोली, गोंडमोहाडी, किडंगीपार, मुरदाडा, महालगाव, धापेवाडा गावाचा संपर्क तुटला आहे. तिरोडा तहसीलदार प्रशांत घोरूडे यांच्याशी संपर्क केला असता किडंगीपार येथे नायब तहसीलदार, तलाठी मंडळ अधिकारी व्यवस्थेसाठी गेले असल्याचे सांगीतले. गोंदियावरुन बोट बोलविण्यात आली आहे.
वैनगंगेने केले रौद्ररुप धारण
ठळक मुद्देअनेक गावांना पुराचा फटका। गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला