शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी पूर नियंत्रण समन्वय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:24 IST

वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.

ठळक मुद्देप्रत्येक गावात नोडल अधिकारी नियुक्त करणार : पूरस्थितीत नदीत पाणी सोडण्याची सूचना मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा, बावनथडी आणि बाघ नदीवर बांधण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास अशा स्थितीत नदीत पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. ही पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने बालाघाटचे जिल्हाधिकारी डी.व्ही.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बालाघाट जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बालाघाट, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.बैठकीला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, बालाघाटच्या जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा राय व गोंदिया,नागपूर, भंडारा, बालाघाट जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील संजय सरोवर प्रकल्पातील पाणी अतिवृष्टीच्या काळात सोडल्यानंतर बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील काही गावे प्रभावित होतात.गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर प्रकल्प, पुजारीटोला व कालिसरार या प्रकल्पातील सुध्दा अतिवृष्टीच्या काळात पाणी सोडल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण होते.बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील काही गावांमध्ये सुध्दा पूरपरिस्थिती निर्माण होते. यावर बैठकीत मंथन करण्यात आले.शिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीवर भिमगड प्रकल्प व बालाघाट जिल्ह्यातील बावनथडी नदीवर बांधण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील बाघ नदीवर बांधण्यात आलेले शिरपूर, पुजारीटोला व कालिसरार प्रकल्पातील नदीमध्ये पूरपरिस्थितीच्या काळात एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार नाही.एका प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर दुसऱ्या प्रकल्पातून पाणी सोडले जाणार नाही.प्रकल्पातून पाणी सोडताना योग्य समन्वयातून पाणी सोडण्यात येईल. गोंदिया जिल्ह्यातील शिरपूर, पुजारीटोला व कालिसरार प्रकल्पात पावसाळ्याच्या दिवसात नियंत्रीत स्वरुपात पाणी सोडण्यात येईल.ज्यामुळे वैनगंगा नदीत पूरिस्थती निर्माण होणार नाही. नदीकाठावरील गावांना पुराचा फटका बसणार नाही. पावसाळ्याच्या दिवसात पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक ते साहित्य व साधने तयार असावीत.या साहित्य साधनांचा वापर करण्याच्या दृष्टीने त्याची रंगीत तालीम सुध्दा घेण्यात यावी.त्यामुळे सुस्थितीत असलेल्या साधनांची माहिती मिळून आवश्यक ते साहित्य खरेदी करता येईल. पूरपरिस्थितीच्या काळात ग्रामस्थांना सावध करण्याचे स्त्रोत अद्ययावत करण्यात येतील.जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यकजिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याशिवाय नदीमध्ये प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार नाही. संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर १७० कि.मी.चा प्रवास करीत हे पाणी १५ ते २० तासामध्ये बालाघाटपर्यंत पोहोचते. त्यामुळे सर्व संबंधित जिल्ह्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची पूर्वसूचना देण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळण्यासोबतच आवश्यक त्या उपाययोजना करता येणार आहे.नोडल अधिकाऱ्याची नियुक्तीप्रसारमाध्यमातून पूरपरिस्थितीबाबतची पूर्वकल्पना ग्रामस्थांना देण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक गावाकरीता एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या काळात ग्रामस्थांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासोबतच उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पूर्ण करण्याचे काम नोडल अधिकारी करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. प्रकल्प पूर्णपणे भरल्यानंतर किंवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबतची सूचना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाणार आहे.

टॅग्स :riverनदी