शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
5
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
6
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
7
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
8
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
9
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
10
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
11
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
12
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
13
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
14
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
15
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
16
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
18
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
19
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
20
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी

मतदानात महिलांचीच आघाडी!

By admin | Updated: July 2, 2015 01:46 IST

‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडत असलेल्या महिलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानातही आघाडी घेतली आहे.

अंतिम टक्केवारी ७५.७४ : नक्षलग्रस्त क्षेत्रातही मतदानासाठी झुंबडगोंदिया : ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडत असलेल्या महिलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानातही आघाडी घेतली आहे. जिल्हाभरात पुरूषांपेक्षा २५४८ महिलांनी जास्त मतदान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण मिळण्याचा हा परिणाम आहे, की आपल्या हक्काबाबत महिला अधिक जागरूक झाल्या हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. प्राप्त अंतिम टक्केवारी ७५.७४ झाली आहे. यात नक्षलग्रस्त देवरी तालुका सर्वात आघाडीवर असून तिथे मतदानाचे प्रमाण ७८.२१ टक्के आहे. गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७३.०६ टक्के मतदान झाले आहे.मंगळवारी मतदानाच्या दिवशीचे चित्र पाहता ग्रामीण भागात सर्वच केंद्रांवर महिलांची गर्दी जास्त दिसत होती. अगदी नवतरुण मतदारांपासून तर शंभरी गाठलेल्या वृद्धांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात पहिल्यांदाच ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे मतदानात महिलांचा उत्साह वाढला असल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी आणि गोरेगाव हे तालुके वगळता इतर चार तालुक्यांमध्ये मतांचे दान करण्यात पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिल्ह्यात ४ लाख १४ हजार ३०२ पुरूष आणि ४ लाख ९ हजार १३१ महिला मतदार असे एकूण ८ लाख २३ हजार ४३४ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख १३ हजार १२७ महिलांनी आणि ३ लाख १० हजार ५७९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी तैनात कर्माचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्यात आली होती. सालेकसा तालुक्यात दरेकसा बिजेपार आणि पिपरीया येथे बेस कॅम्प ठेवले होते. जवळपास ३७ मतदान पथकांना २९ जूनच्या रात्रीचा मुक्काम सशस्त्र दूरक्षेत्रस्थित बेस कॅम्पवर देण्यात आला. तसेच काही मतदान पथक सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये थांबून ३० जूनला सकाळी मतदान केंद्रांवर पोहोचले. गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यात काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार सोडल्यास कुठेही कोणती गडबड झाली. संपूर्ण निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे व सर्व एसडीओ आणि तहसीलदारांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)नक्षलग्रस्त भागात चांगला प्रतिसादविशेष म्हणजे नक्षलग्रस्त असलेल्या २९८ केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ ठेवली होती. तरीही त्या केंद्रांवर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदानाची आकडेवारी कमी पडू दिली नाही. त्यात आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यातील संपूर्ण मतदान केंद्र तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली, आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व बाम्हणी खडकी येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान झाले. गोरेगाव तालुक्यात सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असतानाही तिथे सर्वात कमी मतदान झाले आहे.स्ट्राँग रूममधील ईव्हीएमला खडा पहारामतदानानंंतर उमेदवारांचे भाग्य ठरविणाऱ्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) आठही तालुक्यांच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहोत. त्या स्ट्राँग रूमला सील करण्यात आले असून त्याबाहेर सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा ठेवण्यात आला आहे. या पहाऱ्यासाठी राखीव पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. गोंदियातील ईव्हीएम जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये आहेत. मतमोजणीच्या दिवशीपर्यंत (दि.६) त्या ईव्हीएम अशाच पद्धतीने कडक पहाऱ्यात राहणार आहेत.