शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

भंडारा, गाेंदिया जि.प.सह विदर्भातील ३८ नगर पंचायतीत आज मतोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 11:13 IST

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

ठळक मुद्देनगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार रिंगणात

गोंदिया/भंडारा : विदर्भातील भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज, २१ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. 

गेल्या तीन-चार दिवसापासून विदर्भात हुडहुडी वाढली आहे. कमाल तापमान हे ७.८ अंशावर आले आहे. नागपूरसह गाेंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, यवतमाळ, वर्धा, अमरावतीतील पारा उतरला आहे. परिणामी, सकाळच्या प्रहरी मतदार मतदानासाठी फारसे उत्सूक दिसले नाही. सकाळी ११ नंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील, असे चित्र आहे. 

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गडचिराेलीत सर्वाधिक नऊ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक हाेत असून, तेथे ५५४ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी जागा वगळता ही सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. ओबीसी जागांवरील आरक्षण संपुष्टात आले असून, आता १८ जानेवारी २०२२ राेजी तेथे खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक हाेणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबर हा निवडणुकीचा पहिला टप्पा आणि १८ जानेवारी हा दुसरा टप्पा ठरणार आहे. दाेन्ही टप्प्यातील निवडणुकीचा निकाल एकत्रितरीत्या १९ जानेवारी राेजी लागणार आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहणार आहे. नक्षलप्रभावित गडचिराेलीसह गाेंदियातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी तालुक्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद  -  जागा  -  उमेदवार

भंडारा         -         ३९       -      ४१७

गाेंदिया        -         ४३      -       २४३

जिल्हा           -     न.पं.     -     जागा    -     उमेदवार

अमरावती       -       २                   ३०            १२२

भंडारा             -      ३                    ३९            १६७

चंद्रपूर             -    ६                   ८२             ३३०

गडचिराेली     -      ९                   १४२            ५५५

गाेंदिया           -     ३                   ४५             १९७

नागपूर           -     २                    २६             ९९

वर्धा                -   ४                      ५४             २३३

यवतमाळ        -   ६                     ८४             ४७५

बुलडाणा          -  २                      २६             ९५

वाशीम              -  १                     १३             ५९

एकूण            ३८                     ५४१             २३३२

टॅग्स :ElectionनिवडणूकZP Electionजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती