शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मतदार हा लोकशाहीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:28 IST

मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२५) आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहायक अधीक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर उपस्थित होते.बलकवडे म्हणाल्या, मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्र मांकावर फोन करु न मतदारांनी आपल्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. हा क्र मांक १९५० टोल फ्री असून बी.एस.एन.एल लँंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल. मतदारांनी तहसील कार्यालय, बी.एल.ओ या संकेत स्थळावर भेट देऊन घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आला. त्यांनतर इंदिरा गांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्र मांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून जागरुक मतदार नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजन चौबे यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी