शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवक स्वच्छ भारत अभियानासाठी समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:18 IST

देशातील युवकांचे वाढते प्रमाण हे देशासाठी बलस्थान आहे. या युवाशक्तीला रचनात्मक कार्याकडे वळविण्याचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसचिन सांडभोर : घिवारी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशातील युवकांचे वाढते प्रमाण हे देशासाठी बलस्थान आहे. या युवाशक्तीला रचनात्मक कार्याकडे वळविण्याचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. रासेयो स्वयंसेवक हे स्वच्छ भारत अभियानासाठी सदैव समर्पित असल्याचे प्रतिपादन रावणवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन सांडभोर यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठअंतर्गत ग्राम घिवारी येथे आयोजीत नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील विद्यापीठ पुरस्कार प्राप्त रासेयो शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात आयोजीत शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक प्रा.बबन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाहूतक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंह, सरपंच राजेश कटरे, सोनपुरी सरपंच राखी ठाकरे, एड.योगेश अग्रवाल, माहिती व शिक्षणतज्ज्ञ अतुल गजभिये, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, उपसरपंच सुनिता नागपुरे, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश मस्के, पोलीस पाटील राजकुमार गेडाम उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच कटरे यांनी, नागरिकांना घिवारी गाव गोदरीमुक्त गाव करुन स्वच्छता अभियानात रासेयो स्वयंसेवकांसोबत कार्य करण्याचे आवाहन केले. गजभिये यांनी, राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे मनोरंजनाचे साधन नसून गावकºयांमध्ये गावविकासाचे उत्कृष्ट माध्यम आहे, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मेश्राम यांनी, स्वच्छता अभियानास राष्ट्रीय कार्य म्हणून नागरिकांनी स्वप्रेरणेने कार्य करण्याचे आवाहन केले.संचालन रासेयो सहाय्यक डॉ. संजय जगने यांनी केले. प्रास्ताविक शिबिर प्रमुख रवि रहांगडाले यांनी मांडले. आभार रासेयो महिला प्रतिनिधी प्रा.आशा बघेल यांनी मानले. कार्यक्रमासाठी निशांत मेश्राम, जागृत सेलोकर, आकाश नागपुरे, निकीता गाडेकर, राखी पटले, पूजा उके, वैभव शहारे, गोपाल शर्मा, निशांत वहाने, अक्षय चव्हाण, रमेश बहेटवार, समीर गडपायले, रजत तुरकर, योगेश खोब्रागडे, विठ्ठल हरिणखेडे, प्रतिक सोनेवाने, बादल पाटील यांच्यासह रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.