शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त गोंदियात ऐच्छिक रक्तदान जनजागरण

By admin | Updated: August 27, 2014 23:42 IST

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून स्थानिक बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीतर्फे २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम

गोंदिया : महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त साधून स्थानिक बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीतर्फे २९ आॅगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऐच्छिक रक्तदान जनजागरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात विविध गणेश मंडळाचे सहकार्य व स्वयंसेवी संघटनांचा सहभाग राहणार असल्याची माहिती बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक गावागावात व वार्डांत गणेशाची स्थापना होते. पेंडालमध्ये दहा दिवसपर्यंत विविध जनजागरण कार्यक्रम आयोजित केले जातात. हजारोंच्या संख्येने युवक या गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. हाच औचित्य साधून ऐच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करण्यात येईल, असे रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे व रक्तपेढी अधिकारी डॉ. हुबेकर यांनी सांगितले आहे. यानिमित्त रविवारी (दि.३१ आॅगस्ट) आमगाव शहरात गणेश मंडळातर्फे जयश्री फुंडकर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१ सप्टेंबर) अर्जुनी/मोरगाव येथे अशोक चांडक मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.२) गणेश मंडळ नवेगावबांध येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त गणेश मंडळांनी ऐच्छीक रक्तदानाबाबत पेंडालमधून प्रतिकृती, देखावे, शो तसेच फ्लेक्स, बॅनर्स, माहिती पत्रिका यांच्या माध्यमातून भरपूर जनजागृती करावी, असे आवाहन रक्तपेढी अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केली आहे. शासनाच्या विविध विभागातर्फे जसे पोलीस विभाग, महिला बाल विकास विभाग आदीतर्फे गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये ज्या गणेश मंडळाने ऐच्छीक रक्तदान शिबिर आयोजित करून बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीला रक्त दिले, त्यांना विशेष गुणांकण दिले जाणार असल्याचे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले आहे. ‘एक गाव-एक गणपती-एक शिबिर’ या पद्धतीने जिल्ह्यात ऐच्छिक रक्तदान शिबिरे गणेशोत्सवादरम्यान आयोजित केले जाणार आहेत. तरी रक्तदान शिबिरांकरिता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे व डॉ. अमरीश मोहबे व संबंधित अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)