शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

विवेकानंद व जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

By admin | Updated: January 15, 2017 00:20 IST

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरी करण्यात आली.

गोंदिया : स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांसह सामाजीक संघटनांनी जयंती कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन केले. राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया : येथील राजस्थान कन्या विद्यालयात स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा शाहू यांनी स्वामी विवेकानंद यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून दिप प्रज्वलन केले. तर पर्यवेक्षिका संगीता राजपूत यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनिही अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन करीत शिक्षक राठोड यांनी विवेकानंद यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला. प्रज्ञा तिडके यांनीही विवेकानंद यांच्या जीवनावर माहिती दिली. तर ५ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थिनींही विवेकानंद यांच्याशी संबंधीत कथा व माहिती सादर केली. कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. शारदा कॉन्व्हेंट व हायस्कूल गोंदिया : शाळेत स्वामी विवेकानंद व राजमात जिजाऊ यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या संचालिका योगिता बिसेन, मुख्याध्यापिका उषा रहांगडाले यांनी विवेकानंद व जिजाऊंच्या छायाचित्राला माल्यार्पण केले. विद्यार्थ्यांनी भाषण, गीत व कवितांच्या माध्यमातून त्यांच्या जीवन चरित्र्याचे वर्णन केले. संचालन बरखा दाते यांनी केले. कार्यक्रमासाठी तारा खोटेले, शबाना शेख, विनोद खोब्रागडे, पंकज फुंडे, अनिल माखिजा, संतोष नैकाने, श्रद्धा धांडे, चंद्रकला बसेने, लक्ष्मी पटले, हेमलता दीप, राजेश बिसेन, सागर फरकुंडे, शहारूनिशा पठाण आदिंनी सहकार्य केले. मानवता माध्यमिक शाळा गोंदिया : मानवता पूर्व माध्यमिक शाळेत स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.एफ. बालपांडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एम.झेड. शेंडे, ए.सी. खोब्रागडे, एम.एच. शेंडे, सी.एस. कटरे, एस.पी. कोडापे, एस.पी. शिवरकर, डी.एच. घरत, एल.बी. टेंभरे, बी.एस. भोयर, एल.एम. शेंडे, एस.एस. रिनाईत, एन.बी. गोंडाणे, झेड.पी. टेंभरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात युगपुरुष स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करुन झाली. या जयंती कार्यक्रमानिमित्त प्रास्ताविक सी.एस. कटरे यांनी व्यसनमुक्त, शोषणमुक्त, भयमुक्त समाज घडवावे हेच आपलं सर्वाच कर्तव्य आहे असे मार्गदर्शन केले. तसेच शेंडे व कोडापे यांच्यासह अधून मधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून त्यांना ज्ञात असलेली माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. संचालन झेड.एच. रहांगडाले यांनी केले. आभार एस.वाय. चौरागडे यांनी मानले. मनोहरभाई पटेल इंस्टिट्यूट आॅफ बी.फार्मसी गोंदिया : स्वामी विवेकानंद दिवस प्राचार्य डॉ. नितीन एच. इंदुरवाडे आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्तावतीने पार पडला. प्रास्तावीक प्रा. सुनील चौधरी यांनी मांडले. स्वामी विवेकानंद फक्त संत नव्हते ते देशभक्त, वक्ता, विचारक, लेखक आणि मानव प्रेमी होते. स्वामी विवेकानंद यांचा संपूर्ण जीवन ए:का दिपकासारखा आहे. जो नेहमी आपल्या संसाराला प्रकाश देत राहतो असे मत व्यक्त केले. आभार प्रा. वंजारी यांनी मानले. कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्रा. मोरे, प्रा. अभिषेक पुरोहित, प्रा. श्रेया खान, दिपक फुंडे, उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रासेयोच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. ग्रामपंचायत कार्यालय सिरपूरबांध : ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गजानन शिवणकर, अनुकला कोडापे, माया ताराम, होमराज शिवणकर, सचिव वाय.बी.कटरे, दीपक कोसरकर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सचिव कटरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संचालन करून आभार कृष्णा ब्राम्हणकर यांनी मानले. भागिरथा डोंगरवार विद्यालय, नवेगाव बाराभाटी : विद्यालयात राजमात जिजाऊ यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी टी.टी.कापगते होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाय.जी.पुस्तोडे, आर.टी.लंजे, एच.एस. मुंगमोडे, वाय.झेड.पवार, बी.एस.मेश्राम, नितीन मेश्राम, चंदू खूने, मनिषा सयाम उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. संचालन के.ए.रंगारी यांनी केले. आभार एस.के.निकोसे यांनी मानले. मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी : मनोहरभाई पटेल महाविद्यालयात विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राजमाता जिजाऊ यांनाही अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र बिसेन होते. प्रमुख वक्ता म्हणून डॉ. अभिनंदन पाखमोडे उपस्थित होते. प्रास्तावीक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिता रंगारी यांनी मांडले. आभार सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय मेश्राम यांनी मानले. संचालन आरती मरसकोल्हे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमासाठी गायत्री गुप्ता, सुनिल खलोदे, प्रतीक गेडाम, सुबोध देशपांडे, भवदीप शहारे, प्रवीण सुरसाऊत, नासीर खान, आशिष मानकर, गीता शाहू, टिकेश्वरी सार्वे, चंद्रायणी नेवारे यांनी सहकार्य केले. शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय सालेकसा : महाविद्यालयात आयोजीत युवा दिन कार्यक्रमाच्या