शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

जि.प.च्या आवारात ‘विरूगिरी’

By admin | Updated: March 16, 2017 00:17 IST

रोजगार हमीच्या कामाचा पुरेसा मोबदला मिळावा आणि मस्टर रजिस्टर गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

गोंदिया : रोजगार हमीच्या कामाचा पुरेसा मोबदला मिळावा आणि मस्टर रजिस्टर गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गोरेगाव तालुक्यातील कमरगावच्या वृद्ध मजुराने चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडावर विरूगिरी केली. दुपारी तब्बल साडेतीन तासपर्यंत त्याला झाडावरून खाली उतरविताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. लिखिराम काशिराम राऊत (६५) असे त्या मजुराचे नाव आहे. रोजगार हमीच्या कामात कमी मजुरी देऊन आपल्यावर अन्याय झाला, सतत लढा देऊनही अधिकारी लक्ष देत नाही, असे सांगत राऊत यांनी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दुपारी गोंदियातील जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे दुपारी १ वाजताच्या सुमारास राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील ध्वजस्तंभासमोर रस्याकडील बाजुने असलेल्या झाडावर धाव घेतली. काही वेळातच ते झाडावर उंचावर जाऊन बसले. आपल्यावर अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि आपल्याला कामाचा पुरेपूर मोबदला द्या, त्याशिवाय आपण खाली उतरणार नाही, असे म्हणत त्यांनी झाडावर ठाण मांडले. हा प्रकार पाहून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) नरेश भांडारकर यांनी तत्काळ पोलीस आणि फायर ब्रिगेडला बोलविले. मात्र गोंदिया न.प.चे फायर ब्रिगेड कुचकामी ठरले. त्यानंतर जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी १५ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिले. पण तरीही राऊत मानले नाही. शेवटी ग्रामीणचे ठाणेदार पाटील, प्रहारचे प्रमोद गजभिये व पत्रकारांनी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितल्यामुळे ४.३० वाजता ते खाली उतरले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.(जिल्हा प्रतिनिधी) काय आहे प्रकरण? लिखिराम राऊत यांनी २०१२ मध्ये रोहयोतून रोपवाटिकेचे काम केले. त्यावेळी १४५ रुपये मजुरी असताना त्यांच्या खात्यात केवळ ८० रुपये प्रमाणे पैसे जमा झाले. आपल्याला पुरेपूर मोबदला मिळावा म्हणून त्यांनी बिडीओ, तहसीलदारांपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दाद मागितली, परंतू न्याय मिळाला नाही. आता बिडीओ तेव्हाचे मस्टर रजिस्टरच गायब झाल्याचे सांगत आहेत. जर तसे झाले असेल तर पोलीस तक्रार का करीत नाही? असा रोहयो मजूर राऊत यांचा सवाल आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. तीन सदस्यीय समिती नेमणार लिखिराम राऊत यांना कसेबसे खाली उतरविल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कक्षात नेण्यात आले. यावेळी चर्चा करताना या प्रकरणाची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करून राऊत यांच्यावर खरोखर अन्याय झाला का याची तपासणी केली जाईल, असे आश्वासन सीईओ डॉ.पुलकुंडवार यांनी दिले.