शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून वनकायद्याचे उल्लंघन

By admin | Updated: September 2, 2016 23:58 IST

तिरोडा तालुक्यातील चुरडी (गराडा) येथील वनजमिनीवर असलेल्या तलावाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन जिल्हा परिषदेने त्याला तलावाचा

चुरडी वनतलाव प्रकरण : अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे करताहेत लिलावमनोज ताजने गोंदियातिरोडा तालुक्यातील चुरडी (गराडा) येथील वनजमिनीवर असलेल्या तलावाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन जिल्हा परिषदेने त्याला तलावाचा मत्स्यपालन संस्थेला वारंवार लिलाव केल्याचे दिसून येत आहे. वनकायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असताना वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष कसे केले? हा प्रश्न मात्र अनाकलनिय आहे.केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर वनविभागाने मे २०१६ मध्ये झुडूपी जंगलात येणाऱ्या त्या वनतलावाची जागा तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पाला हस्तांतरित केली. मात्र त्या जमिनीच्या मालकीसंदर्भात जिल्हा परिषदेकडे कोणतीही कागदपत्रे नसताना केवळ परंपरेने चालत आलेल्या प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हा परिषदेकडून त्या तलावावर मालकी हक्क सांगितला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे अदानी प्रकल्प व्यवस्थापनाने त्या जागेच्या वनविभागाकडील मालकी हक्कापासून तर अदानी प्रकल्पाला हस्तांतरित केल्यापर्यंतचे सर्व कागदपत्रे, ज्यात टीएलआर प्रमाणपत्र, हस्तांतरण प्रमाणपत्र, पी-१ प्रमाणपत्र, १९५७-५८ चे निस्तार अधिकार आणि अधिकार अभिषेक आदी सर्व संबंधितांसमोर सादर केले. त्यावरून महसूल विभाग व वनविभागचे अधिकारी त्या जागेवर आता अदानी प्रकल्पाचा अधिकार असल्याचे मान्य करीत आहेत. विशेष म्हणजे त्या वनतलावाच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होत असला तरी अधिकृतपणे कोणीही शेतकरी त्या पाण्यासाठी पाणीपट्टी भरीत नव्हते. ती वसूल करण्याचा अधिकारही कोणाला नव्हता. मात्र आता अदानी प्रकल्पाच्या वतीने त्या जागेचा ताबा मिळाल्यानंतर जागेचे सपाटीकरण करण्यास सुरूवात केली असता परिसरातील शेतकरी व मत्स्योत्पादनासाठी त्या वनतलावाचा उपयोग करणाऱ्या संस्थेकडूनही ओरड करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेने सुरात सूर मिसळून आपला हक्क दाखविण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार वनकायद्याचे उल्लंघन करणारा असून त्यासाठी वनकायद्यानुसार जिल्हा परिषदेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.