शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी पालन अन्‌ दुसऱ्या दिवशीच उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दुसरी लाट देखील पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या लेव्हल वनमध्ये समावेश होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. सुदैवाने डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद जिल्ह्यात झाली नाही, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.

ठळक मुद्देबाजारपेठ ४ वाजतानंतरही सुरूच : ग्राहकांची गर्दी कायम, नियम धाब्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  काेरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.२८) नवीन निर्बंध लागू करण्यात आले. यानुसार जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच व्यावसायिकांनी याचे पालन केले. मात्र, मंगळवारी दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेतील बहुतेक दुकाने सायंकाळी ४.४५ वाजतापर्यंत सुरूच होती. त्यामुळे पहिल्या दिवशी पालन अन्‌ दुसऱ्या दिवशी उल्लंघन असेच चित्र होते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दुसरी लाट देखील पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या लेव्हल वनमध्ये समावेश होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. सुदैवाने डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद जिल्ह्यात झाली नाही, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नगर परिषद, महसूल आणि पोलीस विभागाला केल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशीच दुपारी ४ वाजता पोलिसांनी बाजारपेठेत फिरून वेळेत दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पहिल्या दिवशी नियमांचे पालन झाले. हेच चित्र यापुढे देखील कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नियमांना धाब्यावर बसविल्याचे चित्र होते. 

पोलीस पथक झाले गायब - डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.२८) कडक निर्बंध लागू करण्याचे पत्र काढले. त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, पोलीस आणि महसूल विभागावर जबाबदारी निश्चित करून दिली. पहिल्या दिवशी पोलीस पथकाने शहरातील बाजारपेठेत फिरून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी हे पथक गायब झाल्याने दुकाने सायंकाळी ४.४५ पर्यंत सुरूच होती.न.प.ला पडला कारवाईचा विसर - कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ग्राहक आणि व्यावसायिकांवरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. नगर परिषद आणि महसूल विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती, पण दोन दिवसांपासून नगर परिषदेलासुद्धा कारवाई करण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे. 

दासगाव येथे आठवडी बाजार सुरूच - जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यानंतर गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे मंगळवारी आठवडी बाजार सुरू होता.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार