लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, रामाटोला, चांदोरी खुर्द गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आली आहे. वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.बुधवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे. डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डांर्गोली आणि कोरणी, कासा, पुजारीटोला या गावातील अर्धी घरे पाण्याखाली आली होती. ग्रामपंचायत आणि शाळांमध्ये सुध्दा पाणी साचले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना दुसरीकडे पावसाने कहर केल्याने नागरिकांवर नैसर्गिक आणि कृत्रिम संकट ओढावले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डांर्गोली, काटी, कोरणी, ढिवरटोला या गावांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. कोरणी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षित स्थळी हलविले. तर ढिवरटोला येथील १४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमूने मदत कार्य सुरू केले होते.२४ महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मागील चौवीस तासात २५२४.२० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७६.४३ मिमी पाऊस पडला. तर ३३ महसूल मंडळापैकी २४ महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
संततधार पावसाने गावे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST
तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे.
संततधार पावसाने गावे पाण्याखाली
ठळक मुद्देडांगोर्ली, कोरणी, कासात मदत कार्य सुरु: आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू दाखल : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले