अंकुश गुंडावार। लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली.या योजनेमुळे गाव शिवार पाणीदार झाले.मात्र या योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.टोयागोंदी झाले जलयुक्तसालेकसा तालुक्यातील नक्षलप्रभावित टोयागोंदी गावाची जलयुक्त शिवार अभियानातंर्गत २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आली. या गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ १०५८ असून २०५.२५ सिंचन क्षेत्र होते. या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे १२६४ टीएमसी पाणी साठ्यात वाढ करण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळीत १ ते दीड मिटरने वाढ झाल्याने गावकऱ्यांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली.
‘जलयुक्त’ने गाव शिवार होतेय पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:26 IST
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली.
‘जलयुक्त’ने गाव शिवार होतेय पाणीदार
ठळक मुद्दे३९९ गावांमध्ये राबवली योजना : योजना चांगली, मात्र कामाच्या गुणवत्तेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष