शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

वैनगंगा नदीच्या पुरामुळे 'ती' गावे अद्यापही पाण्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:25 PM

मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी या गावांना पुराचा वेढा कायम आहे.

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही तालुक्यांतील २० गावे शुक्रवारपासून पाण्याखालीच आहे. रविवारी (दि.३०) सुद्धा ही गावे पाण्याखालीच होती. मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी या गावांना पुराचा वेढा कायम आहे.गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राह्मणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला तर तिरोडा तालुक्यांतील रामाटोला, धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी खुर्द या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे.चांदोरी खुर्द येथील मुलचंद भोयर, रवी भोयर, हरिश्चंद्र भोयर, बिसन सोनेवाने, किसन सोनेवाने, रुपलाल जमईवार, तिलकसाव जमईवार, दिलीप भगत, गिरधारी, जमईवार, डुलीचंद तुंबा, मुना तुंबा, भिवराम तुंबा, कालुतुंबा, भरत तुंबा यांच्या घरांमध्ये पाणी साचले होते. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या गावांमधील पूरपरिस्थिती कायम आहे. तर काही गावातील नागरिकांनी आपल्या घरांच्या छतावर आश्रय घेतला होता. गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चम्मूने पुराचा वेढा असलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य रविवारी सकाळपासूनच सुरू केले.