शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
3
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
4
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
5
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
6
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
7
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
8
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
9
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
10
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
11
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
12
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
13
Astrology Predictions 2026 : ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
15
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
16
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
17
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
18
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
19
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
20
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांवर गावाच्या कारभाराची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:52 IST

शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला.

ठळक मुद्देओवारा ग्रामपंचायत अभिनव उपक्रम। निर्णयाची अंमलबजावणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला. असा अनोखा प्रयोग राबविणारी कदाचित ओवारा ग्रामपंचायत राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असावी.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्याची जबाबदारी ही त्या गावच्या ग्रामपंचायतीवर असते.यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवड केली जाते. लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करण्याची जबाबदारी असते. मात्र, स्थानिक राजकारणामुळे या लोकनियुक्त प्रतिनिधींना बरेचदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत असतो. राज्यघटनेत ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावाच्या विकासाचा आराखडा हा लोकांच्या सहमतीने ग्रामसभेत मंजूर केला जातो. मात्र, आज देखील ग्रामीण भागात ग्रामसभांना लोकांची उपस्थिती फार कमी असते. यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे ओवारा येथील उपसरपंच कमल येरणे यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना हा अनुभव येण्यासाठी गावचे सरपंच हिरामन टेकाम यांच्यासह सह सर्व सदस्यांनी प्रस्ताव पारीत करून एक दिवसाचा कारभार हा शालेय विद्यार्थ्यांवर सोपवून त्यांच्यामध्ये ग्राम विकासाची जाणीव निर्माण करून विकास कामात येणाºया अडचणी आणि गावाचा कारभार कसा चालवायचा याची माहिती दिली.एकाच दिवसात अनेक प्रस्ताव पारितया नवनियुक्त शालेय लोकप्रतिनिधींनी २४ जुलैला एक दिवस ग्रामपंचायतचा कारभार सांभाळला. सरपंच निलेश कोडवते, उपसरपंच साक्षी बिसेन यांनी सर्व सदस्यांनी गावाची संपूर्ण पाहणी केली. यानंतर झालेल्या सभेत गावातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, ग्रामीणांचे आरोग्य, रस्ते विकास, सांडपाण्याची विल्हेवाट, गटारे आदी विषयांवर अनेक प्रस्ताव पारित केले.निवडणूक घेऊन निवडगावाचा कारभारा एक दिवस विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड ही लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन घेण्यात आला. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. निवडणुकीत सरपंच म्हणून निलेश कोडवते,उपसरंपच म्हणून साक्षी बिसेन या निवडून आल्या. सदस्यांमध्ये प्रेरणा मेश्राम, सोनल खरवडे, प्रशांत गजभिये, दिनेश तुरकर, मनिषा भिमटे, संध्या टेकाम, सोहीत ऊईके आणि दुर्गा बिसेन हे विद्यार्थी विजयी झाले.निर्णयांची करणार अंमलबजावणीओवाराचे सरपंच हिरामन टेकाम व उपसरपंच कमल येरणे यांनी एक दिवसाच्या कार्यकारिणीने गावाच्या विकासासंदर्भात घेतलेल्या अनेक विधायक निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ओवारवासीयांना दिले. या अभिनव उपक्र माचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीgram panchayatग्राम पंचायत