शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारबालेसोबत नाचणाऱ्या गोंदियाच्या भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 23:05 IST

गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराचा डान्स बारमध्ये बारबालासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर खळबळ चर्चेला उधाण, पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पारदर्शकता, शिस्त, संस्कृतीची मूल्ये जोपासण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या एका आमदाराचा डान्स बारमध्ये बारबालासह डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम हे या व्हिडिओत ‘सलामे ईश्क मेरी जान जरा कबुल करलो...’ या गाण्यावर एका बारबालेसोबत नाचताना व तिच्यावर पैसे उधळताना दिसत आहेत. या व्हिडिओशी आपला काही संबंध नसून आपली बदनामी करण्याचा हा डाव आहे असे पुराम यांनी म्हटले असले तरी मागील चार पाच दिवसांपासून या व्हिडिओची जिल्हाभरात चर्चा होती. गुरुवारी काही व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर तो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविल्यामुळे आ. पुराम चांगलेच अडचणीत सापडले आहेत.हा व्हिडिओ मुंबईतील एका डान्सबारमधील असल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या एखाद्या कार्यकर्त्याने त्यांचा निवडणुकीच्या तोंडावर पद्धतशीरपणे गेम केल्याची चर्चा आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही नेत्याने या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.विधानसभा निवडणुकीचे तिकिट वाटप जाहीर होताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपाश्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.गुन्हा दाखलदरम्यान आ. पुराम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी बनावट व्हिडिओ तयार करून आणि त्यात माझ्या चेहऱ्याचा वापर करून व्हिडिओ व्हायरल करुन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या व्हिडिओशी माझा तीळमात्रही संबंध नाही. आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात देवरी पोलीस स्टेशन येथे गुरूवारी रीतसर तक्रार केली असल्याचे आ. संजय पुराम यांनी शुक्रवारी देवरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा