शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ मिशन २०२३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात सभा बैठक आयोजित केली होती.

ठळक मुद्दे२४ डिसेंबरला आत्मक्लेश आंदोलन: प्रत्येक जिल्ह्यात जागर

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील ६ वर्षापासून स्वतंत्र्य विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे. यात जनजागृती व आंदोलनाने विदर्भाचा किल्ला लढविला. विदर्भाच्या मुद्दावरुन घुमजाव करणाऱ्या भाजपल धडा शिकविला. यात विदर्भातून त्यांचे १५ आमदार कमी झाले. १५ आमदार हे फक्त ३ ते ४ हजार मताधिक्याने निवडून आले. विदर्भ राज्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचा जनाधार घटला म्हणून राज्यातून त्यांची सत्ता गेली. याच पार्श्वभूमीवर आता विदर्भ मिशन २०२३ राबविले जात आहे.सेना-भाजपची युती तुटली विदर्भ विरोधी शिवसेनेशी युती संपल्यामुळे विदर्भ राज्य वेगळा मिळविण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ डिसेंबरपासून आंदोलन सुरु करुन विदर्भ राज्य मिळवून घ्यायचा चंग बांधला आहे. याच आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात सभा बैठक आयोजित केली होती. बैठकीला समितीचे मुख्य संयोजक राम येवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे यांनी आंदोलनाच्या विषयावर मार्गदर्शन केले.यात प्रामुख्याने २४ डिसेंबर २०१९ रोजी सर्व जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर एक दिवसीय उपोषण आत्मक्लेश आंदोलन, २४ जानेवारी २०२० रोजी गोंदिया येथील वीज वितरण कार्यालयाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर वीज दर निम्मे करा, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, लोडशेडींग बंद करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी २०२० रोजी नागपूर येथे रेल रोको आंदोलन व ३१ मार्च २०२० पर्यंतच्या आंदोलनाच्या मधल्या काळात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कार्यकर्त्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.यात १०० कार्यकर्त्याना प्रशिक्षीत केले जाणार आहे. मार्च महिन्यात २ ते ४ दिवसाकरीता तेलंगणा राज्यात विदर्भातून १०० कार्यकर्ते जाऊन तेथील सरकारला भेटून त्या लहान राज्याचा कसा विकास झाला याचा अभ्यास करणार आहे. १ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून संपूर्ण विदर्भ बंदचे आंदोलन राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.अ‍ॅड. पुष्पकुमार गणबोईर, अ‍ॅड.सचिन बावरीया, ओमप्रकाश सूर्यवंशी, अ‍ॅड. महेश पोगळे, देवराज जगणे व राजेंद्र सोनवाने यांच्यासह तालुका समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ