शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन महिलांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:22 IST

जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी (दि.८) दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन नागपूर ते गोंदिया दरम्यान पूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते.

ठळक मुद्देडीआरएमची उपस्थिती : ट्रेन संचालित करणाऱ्या महिलांचा केले स्वागत

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी (दि.८) दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन नागपूर ते गोंदिया दरम्यान पूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते. या एक्स्प्रेसला केवळ महिला पायलटनेच चालविले नाही तर गार्ड, टीटी व पोलीस कर्मचारी म्हणूनही केवळ महिलांनीच सेवा दिली.महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन पूर्णपणे महिलांकडे देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे या एक्सप्रेसने गुरूवारी (दि.८) प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये उत्सुकता होती. नागपूरवरून विदर्भ एक्स्प्रेसला चालविण्याची जबाबदारी पायलट म्हणून सुनिता चौधरी यांना सोपविण्यात आली. त्यांना सहायक पायलट म्हणून स्रेहा शहारे व गार्ड म्हणून कौशल्या शाहू यांनी कर्तव्य बजावले. सदर तिन्ही महिला कर्मचाºयांसाठी प्रवासी ट्रेनचे संचालन प्रथमच करण्यात आले होते. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान विदर्भ एक्स्प्रेस नागपूरवरून गोंदियासाठी रवाना झाली. या एक्सप्रेसमध्ये टीटी म्हणून आठ महिला कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती.याशिवाय दोन महिला पोलीस कर्मचारी सुद्धा सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होत्या. सर्व १४ महिला कर्मचाºयांचा गोंदिया रेल्वे स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेस पोहचल्यानंतर नागपूर मंडळाचे डीआरएम अमित अग्रवाल, त्यांची पत्नी विधी अग्रवाल व इतर वरिष्ठ अधिकाºयांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी एडीआरएम वाय.एच. राठोड, सीएमजी सुगंधा राहा, सीनियर डोओएम सचिन शर्मा, सीनियर डीसीएम अर्जुन सिबल, सीनियर डीईई बागडे, सीनियर डीईई नारायणलाल, स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, रविनारायण कार, स्थानक व्यवस्थापक (वाणिज्य) पद्मनाथ शास्त्री, वरूणकुमार, डी.के. घोष, के.के. तुरकाने, शैलेंद्रसिंह, अरविंद शाह व आरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक भोलानाथसिंह उपस्थित होते.गोंदिया स्थानकातही ‘महिलाराज’जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अनेक महत्त्वपूर्ण विभागांना महिलांच्या स्वाधीन करण्यात आले. बुकिंग कार्यालयात पूर्णत: महिलाराज होता. येथे बुकिंगसाठी ६ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्थानकावर दोन महिला टीटींना महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. स्वच्छता व्यवस्थासुद्धा केवळ महिलांच्याच हातात राहिली. एकूण २५ महिला सफाई कामगार गोंदिया स्थानकाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सांभाळत होते. ट्रेनच्या अटॅचमेंट-डिटॅचमेंटची जबाबदारीसुद्धा महिलांवरच होती.महिला टीटी विश्रामगृहांचे उद्घाटनगोंदिया रेल्वे स्थानकावर विश्रांती करण्यासाठी आतापर्यंत पर्याप्त जागा उपलब्ध नव्हती. आता पूर्वी जेथे प्लॅटफॉर्म क्रमांक-४ वर वेतन कार्यालय होते, त्या कार्यालयात बदल करून महिला टीटींसाठी विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. येथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. याचे लोकार्पण महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.सॅनेटरी पॅड वितरण मशीनचे लोकार्पणरेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३-४ वर असलेल्या विश्रामगृहात सॅनेटरी पॅड वितरण मशीनचे लोकार्पण डीआरएम अमित अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच उपयोगानंतर पॅडला निरस्त करण्याची मशीनसुद्धा लावण्यात आली आहे. केवळ ५ रूपयांत सदर पॅड महिलांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच याच प्लॅटफॉर्मवर दुसºया महिला विश्रामगृहात सॅनेटरी पॅड वितरण मशनीचे लोकार्पण सेक्रोची अध्यक्ष विधी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.