बिरसी- फाटा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेत तिरोडा तालुक्यातील ग्राम भजेपार (वडेगाव) येथील विक्तुबाबा दंडार मंडळाने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. रोख २१,००० रुपयाचे पारितोषिक देऊन मंडळाचा गौरव करण्यात आला आहे.
लाखनी येथील अनिल निर्वाण, राजू निर्वाण व नगरपंचायत यांच्या वतीने आयोजित विभागीय दंडार स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शफी लढ्ढा, विठोबा कांबळे, अनिल निर्वाण, आयोजक शुभम निर्वाण प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेत भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील ६ दंडारींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कोरोना, मास्क, साबण, आपले कुटुंब आपली जबाबदारी, स्वच्छ लाखनी-सुंदर लावणी, तालुका गौरव गाथा, सुरक्षित अंतर, श्रीकृष्ण लावणी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लावणी, देशवीर लावणी, शिवाजी पोवाडा, केसावर फुगे, बेटी बचाव-बेटी पढाव, टिपरी नृत्य इत्यादी सादर करण्यात आले होते. यात तिरोडा तालुक्यातील ग्राम भजेपार (वडेगाव) येथील विक्तुबाबा दंडार मंडळाने बाजी मारली. या दंडार मंडळाला रोख पारितोषिक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दंडारीत तुमेश टेभरे, गणेश टेभरे, जितेंद्र रहांगडाले, मोहीत पटले, कमलदीप अंबुले, ऋषभ केवतकर, तुषार झाडे, अनिल गधवार, संकेत कोसमे, त्रास टेंभरे, मंडळाचे अध्यक्ष झाडीबोली कलाकार उद्धव टेंभरे याच्यासह कलाकार शिवशंकर कोसमे, प्रभू गधवार, जयदेव रहांगडाले, दयानंद पटले, घनश्याम गिरी, धरम बोपचे, फेकलाल पटले, राजकुमार कोसमे, सुखदेव येवतकर, सुरेंद्र मानकर, हिवराज किरसान, शुक्रराज भुरकुडे, धरम गधवार, रूपेश पटले, अचल बिसेन, पदम टेंभरे, कन्हैयालाल हरीणखेडे, देवचंद चौधरी, रूपेश साखरे, धनलाल टेंभरे, मिलीराम मेश्राम, लीलाधर टेंभरे, लखपती भलावी, शिरीश टेंभरे, हुवेन सैयद, शिखर टेंभरे, कबीर गिरी, लालचंद सदरे, राजहंस पटले, प्रेम कोसमे, शिशुपाल पटले, शिशुपाल रहांगडाले, भोला अंबुले यांनी वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये भाग घेतला होता.