शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

घरच्यांपासून दुरावल्यानेच ‘ती’ अत्याचाराची बळी

By admin | Updated: July 25, 2016 00:17 IST

शहराच्या वसंत नगरातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल पाच लोकांनी तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आपली वासना शमविली.

सामूहिक बलात्कार प्रकरण : तीन दिवस पाच लोकांनी शमविली वासना गोंदिया : शहराच्या वसंत नगरातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल पाच लोकांनी तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आपली वासना शमविली. मात्र यादरम्यान तिने हा सर्व प्रकार कसा सहन केला? तेव्हाच आरडाओरड करून त्यांच्या तावडीतून ती का सुटली नाही? त्या नराधमांच्या जाळ्यात ती कशी ओढली गेली? अशा काही प्रश्नांचा मागोवा ‘लोकमत’ने घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर घटनेच्या आधी घडलेल्या काही घडामोडी आणि घरच्यांपासून दुरावल्या गेल्यामुळेच तिच्यावर हा बाका प्रसंग ओढवल्याचे दिसून आले. वास्तविक सदर पीडित मुलीला आई नाही. त्यातच वडीलांसोबत तिने जुळवून घेतले नाही. वडिलांसोबत पटत नसल्याने १५-२० दिवसांपासून ती घराबाहेर, म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे होती. सुरुवातीला खमारीच्या हलबीटोला येथील मामीकडे ती रहायला गेली. मामीने दोन-चार दिवस घरी ठेवून तिला तिच्या घरी आणून सोडले. परंतु मामेभाऊ रागावेल म्हणून ती मामेभाऊ येण्याच्या आधीच मावशीकडे आमगाव तालुक्याच्या दहेगाव येथे गेली. १६ जुलैपर्यंत मावशीकडे मुक्काम ठोकल्यानंतर ती कुणालाही न सांगता आपल्या घरी जाण्यासाठी म्हणून गोंदिया येथे आली. यादरम्यान तिला विजयनगरातील एक मैत्रिण भेटल्याने तिने पीडितेला मरारटोलीपर्यंत आणून सोडले. वडील रागावतील या भितीने तिने घरी न जाता सरळ १६ जुलैच्या रात्री १० वाजता गोंदिया रेल्वेस्थानक गाठले. प्लेटफार्म टिकीट काढून ती तिथेच थांबली. १७ जुलैच्या पहाटे १.४५ वाजता रेल्वे पोलीस चौकशी करीत असताना त्या मुलीला ‘तू एकटी कशी?’ अशी विचारणा केल्यावर तिने माझा भाऊ मोबाईल विसरल्यामुळे मोबाईल आणायला घरी गेला, तो आल्यावर आम्ही पुढच्या प्रवासाला निघू, अशी खोटी माहिती दिली. त्यामुळे पोलीस निघून गेले. - अन् त्यांनी सावज टिपले पोलीस निघताच दोन मिनिटांनी तिच्याजवळ दोन अनोळखी तरुण आले. त्यातील २१ वर्षाच्या छोटू उर्फ प्रशांत मूलचंद मोटघरे याने तू इथे थांबली तर पोलीसवाले प्रश्न विचारुन तुला त्रास देतील. त्यामुळे तू आमच्यासोबत चल, असे म्हटले. त्यावर कुठे नेता, असे त्या मुलीने म्हटल्यावर बाहेर चल, इथे सांगणार नाही असे म्हणून तिला रेलटोली भागातील गेटकडे नेवून लाल रंगाच्या मोटरसायकलवर बसविले. यावेळी प्रशांत गाडी चालवत होता तर मागे मुकेश देवीदास मेश्राम (३४) हा बसला होता. मधात त्या मुलीला बसविण्यात आले होते. तिला दुर्गा मंदिराजवळील बाजूला असलेल्या एका खोलीत नेवून १५ मिनिटे थांबविण्यात आले. मुकेश व छोटू आपसात चर्चा करीत असल्यामुळे तिला त्या दोघांची नावे समजली. १५ मिनिटानंतर मुकेशच्या बहिणीच्या रामनगर हद्दीत असलेल्या खोलीवर तिला नेण्यात आले. त्यावेळी पहाटेचे ३.३० वाजले होते. तिथे सोडल्यावर छोटू उर्फ प्रशांत निघून गेला. काही वेळाने त्या खोलीवर तीन लोक आले. त्यांनी तिला नास्ता दिला व खोलीत डांबून ते बाहेर निघून गेले. अवघ्या पाच मिनिटातच छोटूने तिने येऊन तिला आपली शिकार बनविले. त्यानंतर बाजूच्या खोलीत असलेल्या सुंदरनगर येथील नीतेश उर्फ लाला ब्राह्मणकर (२३) आणि अभिजीत राजेश बडगे (१९) यांच्यापैकी लालाने तिच्यावर बळजबरी केली. १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता आणि दुपारी ४.३० वाजता आणि रात्री ११ वाजता तिच्यावर अत्याचार केला. प्रत्येक वेळी बाहेर जाताना तो खोलीचे दार बाहेरून लावून घेत होता. १८ जुलैला सायंकाळी ४ वाजता मोटरसायकल घेवून छोटू आला त्याने तिला मोटरसायकलवर बसवून कुडवा चौकात नेले. तिथे त्या दोघांना कलीम भेटला. कलीम व छोटूचे बोलणे झाल्यानंतर छोटूने तिला इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला असलेल्या तलावाकडे एकांतात नेवून आपली वासना शमविली. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिला जयस्तंभ चौकात आणल्यावर छोटूला कलीम भेटला. पीडित मुलीला कलीमच्या गाडीवर बसण्यास सांगण्यात आले. कलीमने निर्मल टॉकीज रस्त्यावर थांबवून आपल्या मित्राच्या खोलीवर नेऊन रात्रभर तिला लुटले. कुठे जावे, कोणाला सांगावे? १९ जुलैच्या सकाळी ८ वाजता कलीमने तिला स्टेशनवर आणून सोडले. ती फलाट क्रमांक १ वर थांबली. पुन्हा दुपारी १२ वाजता कलीम स्टेशनवर आला आणि तू इथे काय करणार, माझ्यासोबत चल असे म्हणून त्याने आपल्या गाडीवर बसवून तिला गोंदिया शहराच्या आजूबाजूला नेले. रात्री ८ वाजता पुन्हा कुंभारटोलीच्या एका खोलीत नेऊन जेवण दिले. त्यावेळी दोन व्यक्ती होते. परंतु काही वेळाने ते निघून गेले. २० जुलैच्या रात्री १२.३० वाजता कलीमने पुन्हा तिला आपल्या वासनेची शिकार बनवून या प्रकाराची वाच्यता कुठे केली तर ठार करीन अशी धमकी दिली. रात्र तिच्यासोबत काढल्यानंतर २० जुलैच्या सकाळीच ७ वाजता रेल्वेस्टेशनवर आणून सोडले. दुपारी १२ वाजता ती मुंबई मेलने नागपूरला बहिणीकडे जाण्यासाठी निघाली. दोन वाजता नागपूर येथे पोहोचल्यावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे तिच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर माजले होते. भितीने तिचे मन सुन्न झाले होते. कशीबशी ती नागपूर स्टेशनवरून बर्डीपर्यंत पोहोचली. मात्र बहिणीकडे जाण्यास घाबरल्याने ती पुन्हा गितांजली एक्स्प्रेसने गोंदिया रेल्वे स्थानकावर रात्री ९ वाजता पोहोचली. रात्रभर वेटिंग हॉलमध्ये काढल्यानंतर २१ जुलैच्या सकाळी फलाट क्र.१ वर असताना तिला विना तिकीट पकडण्यात आले. यावेळी तिच्या मामेभावाला बोलावून त्याच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु इतके दिवस कुठे होती, याचा समाचार मामेभावाने घेतल्यामुळे तिने घडलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर गोंदिया रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी) तीन आरोपींवर यापूर्वीही होते गुन्हे सामूहिक बलात्कार प्रकरणात अडकलेल्या पाचपैकी तीन आरोपींवर यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत. प्रशांत मोटघरे याच्यावर मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत तर डी.जे. वाजविण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे रामनगर पोलिसात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नितेश ब्राम्हणकर याच्यावर मारहाण करुन दुकान फोडल्याचा गुन्हा गोंदिया शहर पोलिसात आहे. तर अभिजित बडगे याच्यावर गोंदिया रेल्वे पोलिसात मारामारी केल्याचा कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता असल्याची तक्रार नव्हती वडीलासोबत वाद करुन नेहमी घराबाहेर राहणारी ही मुलगी मागील १५ ते २० दिवसांपासून घराबाहेर असूनही तिच्या पालकांकडून जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली नव्हती. नातेवाईकांकडे ती असावी असा घरच्यांचा समज होता. असेल नातेवाईकांकडे, असे गृहित धरुन घरचे लोक व नातेवाईक असल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची पाळी आली.