शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविवाह समारंभ रद्द झाल्याने वांगी फेकली । मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वांगी हे नगदी पीक आहे. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. काही आॅर्डर पण घेतले. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे विवाह समारंभ रद्द झाले. प्रतीक्षा करता करता वांगी झाडावरच पिकली. अन अखेर ती शेताबाहेर फेकून देण्याची वेळ बाकटी येथील भास्कर हेमने या शेतकऱ्यावर आली.गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.हेमने यांनी दोन एकर शेतीत टमाटर, वांगी व मिरची पिकांची लागवड केली आहे. या पिकाचे काय होणार या विवंचनेत ते अडकले आहेत. शेतकरी मोठा असो की लहान,शेती कोरडवाहू असो की बागायती. शेतात धान असो की भाजीपाला. आज जिल्ह्यातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. शेतकºयांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. काल परवापर्यंत हाच शेतकरी खुश होता. मात्र कोरोनासारखे संकट घोंगावेल व आपली अशी दैना होईल असे या शेतकºयाला वाटले नव्हते.या भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे हाल आहेत. कधी कधी त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळत नाही. अशाही अवस्थेत शेतकरी कसाबसा उत्पादन घेतो.त्यातही असे येणारे विघ्न शेतकºयांचे कंबरडे मोडतात हे नक्की.यंदा खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाला तोंड देत आहे. नैसर्गिक संकटातून सावरत असतानाच शेतकºयांना आता कोरोनारुपी संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती