गोंदिया : कॅशलेस व्यवहारापाठोपाठ आता व्यवहार पेपरलेस करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांची माहिती आता वेबसाईटवर टाकून त्यातूनच व्यवहार करण्यास सुरूवात करण्यात आली. गोंदियात या ‘वाहन’ प्रमाणीनुसार आॅनलाईन कारभारास सुरूवात झाली आहे. उपप्रादेशिक पविहन अधिकारी विजय चव्हाण यांनी या नवीन प्रणालीवर आॅनलाईन माहिती भरण्यासाठी सर्व कंपन्यांच्या वाहनांच्या शोरूम मालकांना परिवहन विभागाच्या वेबसाईटवरील त्यांचा आयटी आणि पासवर्ड दिला. त्यानुसार कंपनीकडून आलेल्या वाहनांची माहिती, विक्री झाल्याची माहिती लगेच वेबसाईटवर टाकणे बंधनकारक केले आहे. एवढेच नाही तर वाहनांची आरटीओ कार्यालयातील नोंदणीसुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे व्यवहार रेंगाळणे दूर होणार आहे. वाहनधारकाला त्याच्या आरसी बुकची माहितीही मोबाईलवर मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
वाहनांची माहिती एका ‘क्लिक’वर
By admin | Updated: April 15, 2017 00:48 IST