शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याची पाणी टाकीवर चढून वीरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:37 IST

सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन  मागे घेतले. प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार शेतकरी युवक संदीप राजेंद्र सरजारे (वय २६) याने सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीवरून चढून शेतात जाणारा पाणंद रस्ता करून देण्याच्या  मागणीला घेऊन वीरुगिरी केली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन  मागे घेतले.   प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे. त्यामुळे ते शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा यासाठी मागील पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीची कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने या प्रकाराने संतापलेल्या संदीपने सोमवारी (दि. १४) गावातीलच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, असा पवित्रा संदीपने घेतला होता. यातच आठ तासांचा अल्टिमेटम देत, आठ तासांच्या आत न्याय न मिळाल्यास पाणी टाकीवरून उडी घेणार, असा इशारा प्रशासनाला दिला होता. या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी दाखल. त्यांनी संदीपला पाणी टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली; पण जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाहीे तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका संदीपने घेतली होती. यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 

संदीपच्या वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मुंडीपार येथील सहा शेतकऱ्यांच्या विरोधात संदीपच्या वडिलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मागील पाच वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या संदीपला अखेर संतापून आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे पाणंद रस्त्याच्या न्याय मागणीसाठी संदीप पाण्याच्या टाकीवर चढला होता. याची दखल तालुका प्रशासनाने घेतल्यानंतर संदीपला पाण्याच्या टाकीवरून उतरण्याची विनंती करण्यात आली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून जागेची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदारांनी संदीपला लवकरच शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संदीप पाण्याच्या टाकीवरून खाली उतरला. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  

टॅग्स :Farmerशेतकरी