शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाची अवकृपा कायम

By admin | Updated: July 18, 2014 00:09 IST

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील

केवळ आठ टक्के रोवण्या : पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकटगोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ आठ टक्केच रोवणीची कामे पूर्ण झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. पाऊस लांबल्याने रोवणीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. जिल्ह्यातील शेती आजही बऱ्याच प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलबंून आहे. त्यामुळे पाऊस समाधानकारक पडल्यास उत्पन्न चांगले होते हे आजवरचे चित्र आहे. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने आधी पेरणी व आता रोवणीचे कामे खोळबंली आहेत. शेतकरी बांधव १५ जुलै पासून रोवणीच्या कामाला सुरुवात करतात. रोवणी करण्याची अंतीम मुदत १५ आॅगस्ट पर्यंत असते. यापेक्षा उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. यावर्षी मात्र अद्याप केवळ आठ टक्के रोवणी झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी आवत्यांवर भर दिला असून सुमारे ६० टक्के आवत्या झाल्या आहेत. तर पावसाचे प्रमाण देखील सरासरी १८५ आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत ५५० मिमी. पाऊस झाला असता तर रोवणीचे चित्र चांगले असते. मात्र यावर्षी दररोज ढगाळ वातावरण राहत असून पाऊस पडत नसल्याने चिंता वाढली आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास धानाच्या पऱ्ह्यावर किड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांचीच केवळ रोवणीची कामे सुरु आहे. तर जवळपास ९२ टक्के शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थितीची टांगती तलावर कायम आहे. (शहर प्रतिनिधी)