शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

राष्ट्रीय चर्चासत्रात विविध वक्त्यांचे मार्गदर्शन

By admin | Updated: November 18, 2015 01:58 IST

एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संस्था संरक्षक प्रफुल्ल पटेल, ...

एस.एस. गर्ल्स महाविद्यालय : वाचनसंस्कृती जोपासणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीगोंदिया : एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संस्था संरक्षक प्रफुल्ल पटेल, संस्थाध्यक्ष वर्षा पटेल व सचिव आ. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात पार पडले. चर्चासत्राचा विषय ‘ इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस इन लायब्ररी एन्ड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस’ हा होता.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार होते. अतिथी म्हणून डॉ.पी.एस.जी. कुमार, अमरावती विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. मोहन खेरडे, कला शाखाप्रमुख डॉ. राजश्री धामोरीकर, गृहविज्ञान शाखा प्रमुख डॉ. माधुरी नासरे व समन्वयक प्रा. राजश्री वाघ उपस्थित होते. बीजभाषक डॉ. कुमार यांनी वाचनालयाचे महत्त्व व स्वरूप स्पष्ट केले. डॉ. खेरडे यांनी वाचनालयाचे कार्य, निवड, साठा, संघटन व वितरण अशा विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले. डॉ.एन.के. बहेकार यांनी महाविद्यालयाची परंपरा, विविध चर्चासत्रांचे महत्त्व व वक्त्यांच्या भाषणाचा सार सांगितला. प्रास्ताविक व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी केले. संचालन डॉ. रेखा लिल्हारे, प्रा. संगीता शहारे, प्रा. राणी खान यांनी केले. चर्चासत्र दोन सत्रांत विविध वक्त्यांच्या व निबंध वाचकांच्या उपस्थितीत चालले. पहिल्या सत्रात धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचे ग्रंथालय विभागातील डॉ. गुरूनाथ हडगली, नागपूर विद्यापीठाचे डॉ. शालिनी लिहीतकर यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. संचालन प्रा. राणी खान व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी मानले. दुसऱ्या सत्रात यवतमाळ येथील आबासाहेब पार्वेकर विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. माडगावकर यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर रायपूर येथील रविशंकर विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. सुवर्णासेन गुप्ता यांनी वाचनालयाची प्राथमिक अवस्था ते आजपर्यंतचा विकास तसेच बदलत्या काळात ग्रंथालयाचे स्वरूप व महत्त्व सांगितले. मराठी विभागप्रमुख प्रा. कविता राजाभोज व भूगोल विभागाचे डॉ. मस्करे यांनी पेपर वाचन केले. संचालन प्रा. संगीता शहारे व आभार प्रा. राजश्री वाघ यांनी मानले.चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अंजन नायडू, प्राचार्य डॉ. बहेकार, डॉ. राजश्री धामोरीकर, डॉ. माधुरी नासरे, प्रा. राजश्री वाघ उपस्थित होते. या वेळी डॉ. नायडू व डॉ. बहेकार यांनी ग्रंथालयांचे स्थान व कार्ये तसेच भविष्यातील योजना यावर मार्गदर्शन केले. डॉ. किशोर काळे यांनी ग्रंथालयाचे उपकरण व मिळणाऱ्या अनुदानाची माहिती दिली. संचालन प्रा. कल्याणी राव व प्रा. राम ठाकूर यांनी केले. आभार प्रा. वाघ यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)