शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:26 IST

वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली.

ठळक मुद्देरॅलीच्या माध्यमातून जनजागृती : पक्षी निरीक्षण व गणनेत विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी/मोरगाव अंतर्गत येणाºया धाबेटेकडी, वडेगाव, बोंडगावदेवी, महागाव सहवनक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून वन्यजीवाची प्रबोधनात्मक माहिती दिली. वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.गावकºयांना वनाबद्दल आकर्षण निर्माण होऊन वनसंपतीचे तसेच वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, प्रत्येक मानवाला वनसंपत्तीविषयी आपुलकी असावी या हेतूने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांचे वृक्ष प्रेम जागृत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या वन रॅलीच्या माध्यमातून गावागावातील लोकांना वन्यजीवाबद्दल जागृती करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात सर्वप्रथम वृक्षवल्लीची पूजापाठ वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आली.सप्ताहाच्या पहिल्या दिवशी बोंगावदेवी सहवनक्षेत्रामधील तिडका भाग ३ बिटामध्ये वनरक्षक एन.एन. पंधरे यांच्या पुढाकाराने वन्यजीव सप्ताहाप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वनक्षेत्राधिकारी रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली. शालेय विद्यार्थी व वनसमिती पदाधिकाºयांसह वन्यजीव सप्ताहाप्रित्यर्थ गावातून रॅली काढून गावकºयांना वनाबद्दल माहिती देऊन जागृत करण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या तिसºया दिवशी माहुरकुडा येथील तलाव तसेच सुरबंधतलाव या ठिकाणी सायंकाळी पक्षी गणना करुन निरीक्षण करण्यात आले. यावेळी वनक्षेत्राधिकारी रहांगडाले, आगासे, पी.एम. राऊत व इतर वनकर्मचारी उपस्थित होते. चवथ्या दिवशी झरपडा येथे डॉ. होमी भाभा विद्यालय, येथील विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारीºयांनी वनरॅली काढली.वृक्ष लागवड करण्यात आलेल्या मिश्ररोपवनात विद्यार्थ्यांना आणून वन्यजीवाबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी क्षेत्र सहायक खडसे, राऊत, नागपुरे, भाभा विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. ५ व्या दिवशी वन्यजीव सप्ताह निमित्त इटखेडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालय इसापूर- ईटखेडा हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी क्षेत्र सहायक पी.एम. केळवतकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीव व निसर्ग संपत्तीचे मार्गदर्शन केले. यावेळी वनरक्षक पी.एम. राऊत, चांदेवार, भैसारे, टेंभरे, पारिसे, सांगोळे इत्यादी वनकर्मचारी उपस्थित होते. सहाव्या दिवशी बोंडगावदेवी सहवनक्षेत्रातील बोदरा-देऊळगाव येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या वतीने गावामधून वनरॅली काढण्यात आली. गावकºयांना वन्यजीवांचे आकलन करुन देण्यात आले. क्षेत्र सहाय्यक एम.एम. धुर्वे, वनरक्षक दहिवले, पंधरे, राजश्री राजगिरे, डोंगरे याप्रसंगी उपस्थित राहून गावकºयांना वनाची महत्ती सांगण्यात आली. वन्यजीव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी वनक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली धाबेटेकडी येथे संयुक्त वनव्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली. वन्यजीव सप्ताहानिमित्त अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात ७ दिवस कार्यक्रम घेवून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.