शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:03 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते.

ठळक मुद्देजिल्ह्याला तीनदा भेट : कार्यकर्त्यांशी जुळली होती नाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते. यामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांची जिल्ह्यात तेव्हा रेलचेल होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गोंदिया जिल्ह्याला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तीनदा भेट दिली. त्यांचे जिल्ह्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते संबंध होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वच जण नि:शब्द झाले. अनेकांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यकर्त्यांशी थेट नाड असणार नेता म्हणजे वाजपेयी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १९७८ मध्ये निवडणूक प्रचारार्थ प्रथम गोंदिया येथे आले होते. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ १९९१ आणि १९९६ मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारार्थ ते गोंदियाला आले होते. या वेळी गोंदिया येथील सध्याच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गोंदिया येथील विश्रामगृहात त्यांनी तेव्हा स्थानिक पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. तर आमगाव येथील माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निवडणूक प्रचारार्थ त्यांची जिल्ह्यात झालेली भाषणे अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत. भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयी यांच्या योगदानामुळेच भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.मौत की उमर क्या हैदो पल भी नहीजिंदगी का सिल सिलाआज है कल नहीया कवितेच्या चार ओळी आजही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत. यावरुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची कार्यकर्त्यांवर किती छाप होती हे दिसून येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी जिल्ह्याला केवळ तीनदा भेट दिली असली तरी या महान नेत्याच्या भेटीच्या आठवणी अद्यापही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांजवळ शब्द नव्हते. यावरुन या महान नेत्याचे कार्य कळत असल्याचे डॉ. राधेश्याम अग्रवाल (बबली) यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी