शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या लसीकरणाला ॲपचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST

सोमवारी पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात लस देण्यात आली नाही. सहा सरकारी रुग्णालयांमध्ये १६५ ज्येष्ठांना लस देण्यात आली. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यासाठी ‘को-विन’ आणि ‘आरोग्य सेतू’ ॲपवर नोंदणी करावी लागते. या ॲपवर नोंदणी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाते. या ॲपची साईडच सुरू हाेत नसल्याने नोंदणी करताना फारच अडचणी येत होत्या.

ठळक मुद्देनियमांची करा अंमलबजावणी : पहिल्या दिवशी खासगी रुग्णालयात लसीकरण नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :   केंद्र सरकारने १ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजाराच्या ४५ वर्षांवरील रुग्णांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचा सुद्धा सहभाग वाढविण्यात आला. याअंतर्गत जिल्ह्यातील १० सरकारी रुग्णालयांत फ्री आणि तीन खासगी रुग्णालयांत २५० रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात लस देण्यात आली नाही. सहा सरकारी रुग्णालयांमध्ये १६५ ज्येष्ठांना लस देण्यात आली.६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यासाठी ‘को-विन’ आणि ‘आरोग्य सेतू’ ॲपवर नोंदणी करावी लागते. या ॲपवर नोंदणी झालेल्यांना सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केले जाते. या ॲपची साईडच सुरू हाेत नसल्याने नोंदणी करताना फारच अडचणी येत होत्या. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना या लसीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी  जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयातून लस दिली नाही.

सुरुवातीला ॲपची अडचण होती. परंतु आता काहीच अडचण नाही. ६० वर्षांवरील लोकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन स्वत: करून घ्यावे. जेणेकरून लसीकरण करणे सोईचे होईल. तीन खासगी हॉस्पिटलला लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तिथे लसीकरण सुरु होईल.- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सात रुग्णालयांत लस देण्यात आली. यात तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५१, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात २९, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात ४६, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी-मोर ४, ग्रामीण रुग्णालय आमगाव २७, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव ८ अशा १६५ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यात पुरुष ९१ तर महिला ७४ लसीकरण करण्यात आले. पहिल्याच दिवशी लसीकरण मोहीमे दरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये यासाठी केवळ सहा लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. मात्र हळूहळू लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस