शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

जिल्ह्यात ८४.४६ टक्के गोवर रूबेला लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:04 IST

सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे८ हजार २९१ बालकांचा शोध : १५ जानेवारीपर्यंत करण्यात येणार लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या गोवर रूबेला लसीकरण अभियानात आतापर्यंत ८४.४६ टक्के लसीकरण करण्यात आले. उर्वरीत ८ हजार २१९ बालकांचा शोध घेऊन १५ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.गोवर-रूबेला आजार सन २०२० पर्यंत निर्मुलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहीम २७ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. या मोहीमेंतर्गत ९ महिन्यापासून १५ वर्षापर्यंतच्या ३ लाख ३५ हजार ९५७ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. यात आत्तापर्यंत २ लाख ८३ हजार ७६१ बालकांना लसीकरण करण्यात आले. आता केवळ १५.५४ टक्के बालकांना लसीकरण करायचे आहे. जिल्हा प्रशासनाने या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्याने ७७.५४ टक्के उद्दिष्टे पूर्ण केले आहे. जिल्ह्यात सालेकसा तालुक्यात ९५.६२ टक्के करून प्रथम क्रमांकावर, यानंतर सडक-अर्जुनी ९४.९४, देवरी ९१.९९, आमगाव ८९.२३, अर्जुनी-मोरगाव ८६.०३, गोंदिया ग्रामीण ७४.२४ तर तिरोडा ग्रामीणमध्ये ९१.४५, गोंदिया शहरात ८६.५५ व तिरोडा शहरात ९०.०८ टक्के लसीकरण करण्यात आले. लसीकरणातून सुटलेल्या बालकांना जिल्हास्तरावरील आकडीवर नजर टाकली असता २ हजार १९६ बालकांचा समावेश आहे. राज्य स्तरावर देण्यात आलेल्या उद्दिष्टातील ८ हजार २१९ बालकांचे लसीकरण झाले नाही. लसीकरणाचे उद्दीष्टे वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.विदर्भात भंडारा पहिलाविदर्भाच्या ६ जिल्ह्यात झालेल्या लसीकरणात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर वर्धा द्वितीय, चंद्रपूर-नागपूर तृतीय, गडचिरोली, चतुर्थ व गोंदिया पाचव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Healthआरोग्य