पांढरी : परिसरातील डुंडा ते म्हसवानी दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रूंदीकरणाच्या कामात निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात आहे. सुमारे सहा ते सात किमी. अंतराचा हा रस्ता असून या कामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रधानमंत्री रस्ता योजनेंतर्गत सुमारे तीन कोटींच्या निधीतून या रस्ता रूंदीकरणाचे काम केले जात आहे. मात्र या कामात कंत्राटदार निकृष्ट गिट्टीचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही रस्ता रूंदीकरणांतर्गत दोन्ही बाजूला साईडींगचे काम करण्यात आले. मात्र त्यात माती मिश्रीत साहित्याचा वापर करण्यात आल्याने गावकऱ्यांनी काम बंद पाडले होते. आता रस्त्यावर टाकण्यात आलेल्या निकृष्ट गिट्टीमुळे या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह उभा होतो. करिता या बांधकामात वडद किंवा पाचगावच्या गिट्टीचा वापर करण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत. विशेष म्हणजे याबाबत येथील अभियंता देशमुख यांच्याशी बोलणी केली असता त्यांनी, या बांधकामात निकृष्ट साहीत्याचा वापर झाल्यास संबंधीत कंत्राटदारावर कारवाई केली जाईल. अशी माहिती दिली. (वार्ताहर)
रस्ता रूंदीकरणात निकृष्ट गिट्टीचा वापर
By admin | Updated: December 22, 2014 22:50 IST