शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युरियाची कोंडी अखेर सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्देदोन दिवसात येणार २६०० मेट्रिक टन युरिया : शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात मागणीपेक्षा युरियाचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणीच्या कामावर याचा परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने याची दखल घेत युरियाची तातडीने मागणी केली आहे. शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात २६०० मेट्रिक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची कोंडी आता पूर्णपणे सुटणार आहे.जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत. तर काही बड्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून ते २६६ रुपयांच्या युरियाची ३५० रुपयांना विक्री करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात असलेले शेतकरी युरियाच्या टंचाईमुळे अधिक अडचणीत आणले आहे. शेतकºयांच्या समस्येची दखल घेवून मागील तीन चार दिवसांपासून लोकमतने हा विषय लावून धरला होता.युरियाचा कसा काळाबाजार केला जात आहे ही बाब सुध्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची कोंडी फोडण्यासाठी तातडीने संबंधित कंपन्याना पुरवठा करण्यास सांगितले. शुक्रवारी कृभंको कंपनीच्या १४०० मेट्रीक टन तर शनिवारी इफको कंपनीचा १२०० मेट्रीक टन युरियाची जिल्ह्यात रॅक लागणार आहे.त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी दीड हजार मेट्रीक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची पूर्णपणे टंचाई दूर होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हा प्रशासन, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवरजिल्ह्यात खताचा काळाबाजार होवू नये तसेच अतिरिक्त दराने शेतकऱ्यांना खताची विक्री होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. युरियाचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. याच अंतर्गत आता वितरकांच्या गोदामांची सुध्दा तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात शनिवारपर्यंत २६०० मेट्रिक टन युरिया येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विभागाने आणखी ३५०० मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांची कोंडी होणार नसून टंचाई पूर्णपणे दूर होईल. खताचा काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती