शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गसंपन्न गोंदियात ‘हॉर्स शू’ या अनोख्या वटवाघळाची नोंद; झेडएसआयची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 01:33 IST

बीएनएचएसच्या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित

गोंदिया : निसर्ग संपन्न गोंदिया जिल्ह्यात हॉर्स शू नामक वेगळ्या प्रजातीच्या अनोख्या वटवाघळाची नोंद नवेगावबांध जवळील प्रतापगडच्या पहाडात केली आहे. विशेष म्हणज, झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (झेडएसआय) यांनी वटवाघळाच्या ओळखीवर शिक्कामोर्तब केले आहे. या वटवाघळासंदर्भात लिहिलेला शोधनिबंध बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

प्रा. डॉ.गोपाल पालीवाल, प्रा.डॉ.सुधीर भांडारकर, झेडएसआयचे वैज्ञानिक डॉ. श्याम तलमले, गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, निसर्ग अभ्यासक अंकुर काळी या चमूने ही नवी नोंद केली आहे. त्यांनी हॉर्स शू वटवाघळाला नवेगाव राष्ट्रीय उद्यानानजिकच्या प्रतापगड पहाडावर पाहिले.

घोड्याच्या पायाला लावण्यात येणाऱ्या नालेला इंग्रजीत हॉर्स शू म्हणतात. त्यामुळे मराठीत या प्रजातीला ‘नाल वटवाघूळ’ म्हणता येईल.अशी पटली ओळख प्रतापगड गाव येथील पहाडावरच्या गुफेत हॉर्स शू प्रजातीचे वटवाघूळ या चमूला मृतावस्थेत आढळले. त्याची निश्चित ओळख होण्यासाठी मृत शरीराचे नमूने झेड.एस.आय. च्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात पाठविण्यात आले तेथे संशोधन करून मग तो नमुना मध्यप्रदेश येथे पाठविण्यात आला. तिथे त्याला योग्यप्रकारे संरक्षित केल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली.पूर्व विदर्भात प्रथमच नोंदनाल वटवाघळ या इवल्याशा सस्तन प्राण्याची ही प्रजाती दक्षिण आशियासह भारतीय उपखंडात काही ठिकाणी आढळते. दिवसेंदिवस वटवाघळांच्या अनेक प्रजातींची संख्या कमी होत असून त्या दुर्मीळ होत आहेत. त्यामुळे त्यांचे वैविध्य तपासण्यासाठी प्रतापगड पहाडाच्या किल्ला परिसरातील गुंफांचा शोध या चमूने घेतला.