शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी प्रकल्पग्रस्तांची

By admin | Updated: January 11, 2015 22:53 IST

धरण बनले, कालवे तयार झाले. सिंचनासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला खरा पण शेतकऱ्यांच्या सुखासाठी शेतीचे बलिदान देणारे प्रकल्प मात्र दु:खावलेलेच आहेत. प्रकल्पग्रस्त अशी मुद्रा लावलेले

संतोष बुकावन - अर्जुनी-मोरगावधरण बनले, कालवे तयार झाले. सिंचनासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला खरा पण शेतकऱ्यांच्या सुखासाठी शेतीचे बलिदान देणारे प्रकल्प मात्र दु:खावलेलेच आहेत. प्रकल्पग्रस्त अशी मुद्रा लावलेले प्रमाणपत्र घेऊन शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. जे शिकले त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र तयार करुन घेतले. पण ज्यांना कळत नाही ते पूर्णत: अनभिज्ञ आहेत. आपण प्रकल्पग्रस्त आहात असे प्रमाणपत्र अथवा मुलाखतीचे पत्र पाठवण्याचे साधे सौजन्य प्रशासनाकडे नाही. भूसंपादनापूर्वी घोषणांची खैरात होते. मात्र प्रकल्प पूर्ण होताच साऱ्या घोषणा हवेत विरतात. लोकप्रतिनिधी मतांच्या राजकारणांसाठी कोरडी आश्वासन देतात. मात्र ५० वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे वचन पाळले गेले नाही. प्रकल्पग्रस्त भकास जीवन जगत आहेत. हे प्रकल्पग्रस्त, पुनर्वसित गावांतील दाहक वास्तव आहे.गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम व संवेदनशील नक्षलग्रस्त भागात पाटबंधारे विभाग गेल्या ५० वर्षांपासून धरण बांधकाम करीत आहे. इटियाडोह, पुजारीटोला, मनोहरसागर, शिरपूर व कालीसराड ही मोठी धरणे बांधली. यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन व घरे, पाटबंधारे विभागाने संपादीत करुन घेतली. कुटंबातील एका व्यक्तीला योग्यतेनुसार प्रकल्प आस्थापनेवर रोजगार नोकरी देण्याचे धोरण शासनाने ठरविले. तसे आदेशही निर्गमित केले. मात्र लोकप्रतिनिधींची उदासिनता व प्रशासनाचे आडमूठे धोरण यामुळे जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त आजही बेरोजगार आहेत.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण हे मोठे धरण आहे. हे धरण १९७२ मध्ये पूर्ण झाले. मात्र यासाठी १९६६-६७ मध्ये भूसंपादन झाले. या धरणामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीचे ओलीत होते. बाघ इटियाडोह धरणवेळी माहूली, कसारी, दर्रेकसा, सालई, तांबोरा, आकटा, गवळीहेटी, गोंडटोला, चिलमटोला, पोकोडोंगरी, सुरतोली, सितकुटोला, भंडारी व इतर बुडीत गावांचे पुनर्वसन करण्यात धरणांच्या कालव्यांसाठी लाभधारक क्षेत्रातील अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या जमीनी भूसंपादन करण्यात आल्या. याच पद्धतीने जिल्ह्यातील पुजारीटोला, मनोहरसागर, शिरपूर व कालीसराड या धरणांसाठी सुद्धा जमीन संपादीत झाली. काही गावे उठवून त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात आले.शासनाच्या पुनर्वसन योजनेंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा कुटुंबातील आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या एकाच व्यक्तीला नोकरी देण्याची तरतूद सामान्य प्रशासन विभागाच्या २१ जानेवारी १९८० च्या परिपत्रकात नमूद आहे. ज्या विभागाच्या प्रकल्पासाठी भूसंपादन होऊन प्रकल्पग्रस्त व्हावे लागले त्या विभागाने ५० वर्षात हजारो पदभरती केली. अनेकांना रोजगार दिला मात्र या प्रकल्पग्रस्तांना विभागात सामावून घेतले नाही हे दुदैवच म्हणावे लागेल. आजही कित्येकांना आपण प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती नाही. अनेकांनी तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अज्ञानापोटी तयारच केले नाहीत. प्रकल्पग्रस्तांची एक संघर्ष समिती आहे खरी पण कित्येक प्रकल्पग्रस्त या समितीत सामिलच झाले नाही. प्रकल्पग्रस्त हे संघटित नाहीत. जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे संघटितरित्या संघर्षाचे रणशिंग फुंकल्याची संधी उपलब्ध होत नाही. महाराष्ट्र शासनाच्या सामन्य प्रशासन विभागाने प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात विविध परिपत्रके काढली. राज्य शासनाचे विभाग, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक गट क व गट ड संवर्गातील पदसंख्येच्या किंवा समतुल्य असलेल्या तांत्रिकेत्तर किंवा तांत्रिक कर्मचारी वर्गाच्या एकूण संख्येच्या पाच टक्यांपेक्षा कमी नसेल इतक्या रोजगाराची प्रकल्पबाधित व्यक्तींच्या नामनिर्देशित व्यक्तींकरिता तरतूद केली आहे. या सर्व तरतूदी असल्या तरी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत उदासिनता कायम आहे. प्रकल्पग्रस्तांची ज्येष्ठता यादीनुसार आजतागायत प्रामाणिकपणे पदे भरल्या गेली असती तरी आज हा अनुशेष दिसून आला नसता. मात्र सकारात्मक प्रयत्नच झाली नाहीत. पुनर्वसन तर झाले मात्र उदरनिर्वाहासाठी रोजगाराच्या प्रतिक्षेत प्रकल्पग्रस्तांची भटकंती आजही सुरूच आहे. (क्रमश:)