शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भजे, समोसे, पकोडे विकून साजरा केला बेरोजगार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिग्री लावून चहा व समोशाची विक्री केली. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती, तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना राेजगार देण्याचे आश्वासन दिले होते; पण मागील तीन वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्येत वाढ झाली आहे. याचाच निषेध नोंदवीत जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने शुक्रवारी (दि.१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भजे, समोसे, पकोडे विकून बेरोजगार दिवस साजरा केला. जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील नेहरू चौक व जयस्तंभ चौक येथे दुपारी १२ वाजता पकोडे विकून अनोखे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातगाडीवरून भजे, समाेसे, पकोडे आणि चहा विक्रीचे प्रतीकात्मक दुकान लावून ग्राहकांना त्याची विक्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समस्त बेरोजगारांची दिशाभूल केली, म्हणून त्यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती यांनी सांगितले.जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. 

डिग्री लावून केली पकोड्यांची विक्री- अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिग्री लावून चहा व समोशाची विक्री केली. हे झाले आंदोलनात सहभागी - यावेळी आ. सहर्षराम कोरोटे, एनएसयूआई अध्यक्ष हरीश तुळसकर, गप्पू गुप्ता, शहरध्यक्ष जहीर अहमद, युवक काँग्रेस प्रदेश सचिव रुचित देवे, शहर महासचिव दलेश नागदवने, अमर राऊत, बंटी कोठारी, मनीष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मजहर खान, विधानसभा अध्यक्ष बाबा बागडे, शहराध्यक्ष रवी चौरसिया, दीपेश अरोरा, राजू गिल, उपाध्यक्ष कीर्ती येरणे, एनएसयूआई शहराध्यक्ष रुकनेज शेख, तालुकाध्यक्ष शैलेश बिसेन, वारीस भगत, कृष्णा बिभार, अनिल रंगिरे, मंथन नंदेश्वर, अमित मरुन्बान, विक्की रहांगडाले, शाहरुख सोलंकी, अमन रोगाटिया सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीcongressकाँग्रेस