शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो ...

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्ष करण्यात यावी, अशी मागणी तयारी करीत असलेल्या बेरोजगार तरुणांनी केली आहे.

लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे

केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.

रोजगार सेवकांना अत्यल्प मानधन

गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांनाच अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार सेवकांच्या या मागणीकडे शासनाने लक्ष देऊन ही मागणी लवकर पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे.

घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची दुरवस्था

मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण आहे.

ब्रेकर ठरत आहेत धोकादायक

गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.

विश्रामगृह तयार करण्याची मागणी

केशोरी : जिल्हास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

स्वच्छतेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष

तिरोडा : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी, डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली. मात्र, अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाहीत.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.

नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त

देवरी : विविध शासकीय कार्यालयांतील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

गोंदिया : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे़ स्वच्छतेच्या अभावामुळे आजारांची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे़.

बसस्थानक ठरत आहे शोभेची वास्तू

गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. या बसस्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाही. तसेच बस थांबत नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे.