गोंदिया : शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने शहरातील खोल भागातील घरांत पावसाचे पाणी शिरते. यामुळे त्या भागातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र शहरातील अंडरग्राऊंड केबलमुळे नाल्यांच्या सफाईत अडसर निर्माण होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पावसाळा लक्षात घेता नगर परिषदेने शहरातील नाल्यांच्या सफाईची मोहिम हाती घेतली होती. पाणी वाहून नेणारे मोठे नाले पालिकेच्या स्वच्छता विभागाने जेसीबीच्या माध्यमातून तर सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील अन्य नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र सफाई दरम्यान अंडरग्राऊंड केबल नाल्यांच्या सफाईत अडसर निर्माण करीत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. शहरात टेलीफोनचे अंडरग्राऊंड केबलचे जाळे पसरले आहे. हे के बल रस्त्यावरून गेले असता त्यांना दाबण्यात आले. मात्र नाल्यांवरून जातान त्यांना दाबणे शक्य नव्हते व ते तेथे उघडेच पडून आहेत. शिवाय नाल्यावरून जात असल्याने त्यात नाल्यातील कचरा अडक तो व त्यामुळे पाण्याची निकासी होत नाही. मध्यंतरी शहरातील आंबेडकर चौक, नेहरू चौैक होत पुढे जात असलेल्या नाल्याची श्री जी लॉन लगत सफाई करण्यात आली. जेसीबी लाऊन स्वच्छता विभागाने नाल्यातील कचरा व गाळ उपसून टाकला. मात्र केबल नाल्यावरून जात असल्याने जेसीबी सुद्धा पाहिजे तशी सफाई करू शकला नाही. एकंदर अंडरग्राऊंड केबलमुळे नाल्यांच्या सफाईत अडसर होत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
अंडरग्राऊंड केबल नाल्या सफाईत अडसर
By admin | Updated: July 20, 2014 00:00 IST