शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
4
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
5
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
6
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
7
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
8
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
9
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
10
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
11
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
12
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
13
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
14
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
15
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
16
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
17
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
18
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
19
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
20
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
Daily Top 2Weekly Top 5

एकाच छताखाली आजारांचे निदान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:36 IST

शिक्षण, पाणी आणि आरोग्य या आजच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी-मोरगाव तालुका हा नक्षल, मागास, आदिवासी व दुर्गम तालुका आहे. सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सामान्य गंभीर आजाराचे निदान व उपचार व्हावे या उद्देशाने या महा आरोग्य मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जनतेला मार्गदर्शन व्हावे व गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सेवेचे महत्त्व वाढावे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.

ठळक मुद्देमधुकर कुकडे : महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : शिक्षण, पाणी आणि आरोग्य या आजच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी-मोरगाव तालुका हा नक्षल, मागास, आदिवासी व दुर्गम तालुका आहे. सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सामान्य गंभीर आजाराचे निदान व उपचार व्हावे या उद्देशाने या महा आरोग्य मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जनतेला मार्गदर्शन व्हावे व गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्य सेवेचे महत्त्व वाढावे, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.नवेगाव येथे आयोजीत महाआरोग्य मेळाव्याच्या उद्घाटना प्रसंगी सोमवारी (दि.११) ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जि.प. सदस्य किशोर तरोणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, पं.स.सदस्य सिशुला हलमारे, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष लेखपाल गहाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोज राऊत, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप खुपसे, अर्जुनी मोरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकीनवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत, राकेश जायस्वाल उपस्थित होते.प्रारंभी धन्वंतरी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात हृदयरोग, मधुमेह, मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, चर्मरोग, कान, नाक, घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार, मौखिक रोग, दंत, मानसिक विकृती, मुलांचे आजार निदान व उपचार आयुष चिकित्सा आयुर्वेद, होमियोपॅथी व युनानी चिकित्सा उपलब्ध करुन देण्यात आली होती. या आरोग्य महामेळाव्यात रेडीओलॉजीस्ट डॉ. घनश्याम तुरकर, शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर, नेत्रतज्ञ डॉ. नितीका पोयाम, जनरल सर्जन डॉ. पर्वते, डॉ. येडे, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनोज राऊत, हृदयरोग तज्ञ डॉ. संजय येडे, औषधशास्त्र विभागतज्ञ डॉ. अकितवार, दंतरोग तज्ञ डॉ. भांडारकर, डॉ. दिपाली कोल्हाटकर, बालरोगतज्ञ डॉ. निलेश ताफडे, त्वचारोग तज्ञ डॉ. सौरभ राऊत, स्त्रीरोग तज्ञ डॉ. पल्लवी नाफडे, डॉ. पांडे, कुष्ठरोग तज्ञ डॉ. जगन्नाथ राऊत, मनोविक्री तज्ञ डॉ. येरणे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.अजय घोरमारे यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात हर्नीया व हायड्रोसील, गाठ व कुटुंब नियोजन अशा एकूण ४४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (केटीएस) गोंदिया येथे उपचार व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनोज राऊत यांनी सांगितले. या महाआरोग्य मेळाव्याचा लाभ जिल्हा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सुमारे ४ हजार नागरिकांनी घेतला. यावेळी रुग्णांना मोफत औषधींचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी मांडले. संचालन क्षयरोग पर्यवेक्षक पवन वासनिक व अ‍ॅड. रेखा सपाटे यांनी केले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी मानले. मेळाव्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. यादव, डॉ. महेश लोथे, डॉ. बाळू कापगते, हेमतराम रिनाईत, हेमराज रंगारी, शिशुपाल ढोके, बडके, कापगते, वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.रक्तदात्यांच्या सत्कार व प्रमाणपत्र वितरणशिबिरात सिकलसेलग्रस्त १२ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच रक्तदान शबिरात रक्तदान करणाºया रक्तदात्यांनाही प्रमाणपत्र देऊन पाहु्ण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विविध आजारासंबंधी माहिती देणारी आरोग्य प्रदर्शनी भरविण्यात आली होती. खासदार कुकडे यांच्यासह पाहु्ण्यांनी प्रदर्शनीला भेट देवून माहिती जाणून घेतली.