शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:53 IST

शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण्यास देखील मदत झाली आहे.

ठळक मुद्देपरिणय फुके : नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, नागरिकांची पायपीट थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराच्या हद्यस्थानी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे यापूर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे.त्यामुळे लोकांची कामासाठी होणारी पायपीट थांबून कामासाठी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम वाचविण्यास देखील मदत झाली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे लोकांची कामे गतीने होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मंगळवारी (दि.३०) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले हे होते. या वेळी प्रामुख्याने खा. सुनील मेंढे, आ.संजय पुराम व विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, ेजि.प.पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे उपस्थित होते. पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, प्रशासकीय इमारती अभावी विविध शासकीेय विभागाची कार्यालये भाड्याच्या इमारतीत शहरात ठिकठिकाणी सुरू होती. ही समस्या दूर करण्यासाठी प्रशस्त प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली. मात्र या इमारतीची देखभाल करणे तितकेच कठीण काम आहे.या इमारतीत २८ विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या इमारतीत अग्नीशमन यंत्र बसविले आहेत. विविध साहित्य कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यासह फर्निचर देखील एकसारखे बसविले आहे.इमारतीच्या परिसरात ६ दुकाने तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक दुकान महिला बचत गटासाठी राखीव ठेवण्यात यावे.बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करणे सोईचे होईल. दुसरे दुकान दिव्यांग बांधवांना उपलब्ध करु न दयावे, तेथे एखादे झेरॉक्स सेंटर सुरु करुन त्याला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमगाव व सालेकसा तहसील कार्यालय इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. लवकरच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.बडोले म्हणाले,या इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट लावण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना येथे कामासाठी ये-जा करणे सोयीचे होणार आहे.प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले.सिंधी समाजबांधवांना आखिव पत्रिकांचे वाटपया वेळी आयोजित कार्यक्रमात शासन निर्णयानुसार गोंदिया शहरातील सिंधी समाजबांधवांना आखिव पत्रिकांचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी आमदार हेमंत पटले व रमेश कुथे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर उपस्थित होते.

टॅग्स :Parinay Fukeपरिणय फुकेRajkumar Badoleराजकुमार बडोले