गोंदिया : लोधी समाजाच्या नवयुवक मिलन समारंभ समिती, अवंतीबाई बहुउद्देशिय संस्था, लोधी कर्मचारी संघटना व लोधी अवंती सेना या चारही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारीला गोंदियात लोधी युवक-युवती परिचय संमेलन व लोधी मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री उमा भारती व लोधी साधना भारती उपस्थित राहणार असल्याचे लोधी संघटनांच्या वतीने कळविण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
उद्या लोधी मिलन समारंभात उमा भारती
By admin | Updated: January 16, 2016 02:14 IST